जिल्ह्याच्या आरोग्य विभागातील रिक्त पदे भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:27 IST2021-01-10T04:27:52+5:302021-01-10T04:27:52+5:30
गडचिरोली : जिल्ह्यातील आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त असल्याने रुग्णांना याेग्य सेवा मिळण्यास अडचणी येत आहेत. उपचाराअभावी अनेक ...

जिल्ह्याच्या आरोग्य विभागातील रिक्त पदे भरा
गडचिरोली : जिल्ह्यातील आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त असल्याने रुग्णांना याेग्य सेवा मिळण्यास अडचणी येत आहेत. उपचाराअभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने लक्ष देऊन जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकर भरावी, अशी मागणी आ. डॉ. देवराव होळी यांनी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली. मुंबई मंत्रालयात ना. टाेपे यांची भेट घेऊन आराेग्यविषयक समस्यांवर चर्चा केली.
गडचिरोली जिल्ह्यात एकमेव असलेल्या महिला व बाल रुग्णालयात अजूनपर्यंत संपूर्ण पदे भरण्यात आली नाही.. त्याचबरोबर जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनेक पदे रिक्त आहेत. याबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करुनही काहीच उपयाेग झाला नाही. नागरिकांच्या आराेग्याबाबत राज्य सरकार गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने लक्ष देऊन जिल्ह्याच्या आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरावी, अशी मागणी आ. डॉ. देवराव होळी यांनी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली.