जिल्हा सामान्य रूग्णालयातील परिचारिकांची रिक्त पदे भरा
By Admin | Updated: July 30, 2016 01:55 IST2016-07-30T01:55:23+5:302016-07-30T01:55:23+5:30
जिल्हा सामान्य रूग्णालयात परिचारिकांची सुमारे १२६ पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ ६६ पदे भरण्यात आली आहेत.

जिल्हा सामान्य रूग्णालयातील परिचारिकांची रिक्त पदे भरा
३ आॅगस्टपासून आंदोलन : नर्सेस संघटनेचे निवेदन
गडचिरोली : जिल्हा सामान्य रूग्णालयात परिचारिकांची सुमारे १२६ पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ ६६ पदे भरण्यात आली आहेत. तर ६० पदे रिक्त आहेत. कार्यरत परिचारिकांना रात्रंदिवस काम करावे लागत आहे. रिक्त पदे भरण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस संघटनेच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. पदे न भरल्यास ३ आॅगस्टपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा सामान्य रूग्णालयात ६० अधिपरिचारीका कार्यरत आहेत. त्यातीलही सहा अधिपरिचारीका पर्यवेक्षिका म्हणून पदभार सांभाळत आहेत. त्यापैकी काही अर्जित रजेवर किंवा वैद्यकीय रजेवर गेल्या असून केवळ ४० अधिपरिचारिका कामे सांभाळत आहेत. रूग्णालयात दर दिवशी ४०० ते ५०० रूग्ण भरती राहतात. कर्तव्यावर हजर असलेल्या अधिपरिचारीकांना अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. त्याही परिस्थितीमध्ये त्या काम करीत आहेत. रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. (नगर प्रतिनिधी)