चेरपल्ली-पुसुकपल्ली मार्गावरील खड्डे बुजवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:44 IST2021-09-09T04:44:17+5:302021-09-09T04:44:17+5:30
चेरपल्ली-पुसुकपल्ली मार्गावरून माेठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. सध्या या मार्गावर असंख्य खड्डे पडल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा ...

चेरपल्ली-पुसुकपल्ली मार्गावरील खड्डे बुजवा
चेरपल्ली-पुसुकपल्ली मार्गावरून माेठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. सध्या या मार्गावर असंख्य खड्डे पडल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या मार्गावर रहदारीस मोठी अडचण येत आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसांच्या आत खड्डे बुजविण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन चेरपल्ली व पुसुकपल्ली गावातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल मेश्राम यांना पाठविले आहे. पुसुकपल्ली मार्गावरील अनेक ठिकाणचे डांबरसुद्धा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्यामुळे या मार्गावरून सायकल, दुचाकी आणि चारचाकीदेखील चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे सदर मार्गाची लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी दीपक सुनतकर, सुमन कोंडागुर्ले, राकेश कोसरे, प्रदीप भोयर, विजय बोरकुटे, दिवाकर कांबळे, संतोष झाडे, अरुण रामटेके, सुधाकर भोयर, किशोर जवादे, व्यंकटेश चौधरी, रामू भोयर यांनी केली आहे.
बाॅक्स
रुग्णांना सर्वाधिक त्रास
पुसुकपल्ली हे गाव महागाव बु. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येते. पुसुकपल्ली येथे उपकेंद्र आहे. गावातील नागरिकांना उपचारांसाठी महागाव येथे जावे लागते. परंतु सदर मार्गावरच खड्डे पडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. खड्डेमय रस्त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची समस्या लक्षात घेऊन लवकर रस्त्याचे नूतनीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
080921\img-20210908-wa0008.jpg
चेरपल्ली - पुसुकपल्ली मार्गावरील खड्डे बुजविण्यात यावे