मागासवर्गीयांच्या रिक्तपदांचा अनुशेष भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:39 IST2021-08-27T04:39:47+5:302021-08-27T04:39:47+5:30
गडचिराेली : मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या सरळ सेवेच्या अनुशेष व रिक्तपदांचा अनुशेष भरण्यात यावा. वर्ग ४ मधून वर्ग ३ मध्ये पदाेन्नत्या ...

मागासवर्गीयांच्या रिक्तपदांचा अनुशेष भरा
गडचिराेली : मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या सरळ सेवेच्या अनुशेष व रिक्तपदांचा अनुशेष भरण्यात यावा. वर्ग ४ मधून वर्ग ३ मध्ये पदाेन्नत्या देण्यात याव्या, अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने शासनाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी संजय मिना यांच्या मार्फत शासनाला पाठविण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांचा संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला.
कारकून ते अव्वल कारकूनच्या पदाेन्नती करण्यात याव्यात, आकांक्षित गडचिराेली जिल्ह्यांतर्गत शालेय विद्युत बिलाची थकीत रक्कम भरण्यात यावी, गरजू विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वाचनालयाची निर्मिती करावी. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या कार्यालयासाठी स्वतंत्र खाेली व जागा उपलब्ध करून द्यावी. दिव्यांगांचा अनुशेष भरण्यात यावा. तसेच दिव्यांगांसाठी १५ व्या वित्त आयाेगाकडून स्वतंत्र निधीची तरतूद करावी आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाला पाठविण्यात आले.
निवेदन देते वेेळी संघटनेचे विभागीय अध्यक्ष राजकुमार घाेडेस्वार, अध्यक्ष दिगांबर डाेर्लीकर, चक्रपाणी कन्नाके, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद फुलझेले, रायसिंग राठाेड, विद्युतलता भानारकर, जीवन सलामे, पुष्पा पारसे, चंदू रामटेके, सिद्धार्थ भैसारे, महेंद्र वटी आदी उपस्थित हाेते.