घरकुल प्रकरणाबाबत एफआयआर दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:38 AM2021-05-07T04:38:49+5:302021-05-07T04:38:49+5:30

देसाईगंज नगर परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर नगरसेवकांनी २०११ ते २०१६ या कालावधीत निकषात न बसणाऱ्या नागरिकांनासुद्धा घरकुलांचे वितरण ...

File an FIR in the Gharkul case | घरकुल प्रकरणाबाबत एफआयआर दाखल करा

घरकुल प्रकरणाबाबत एफआयआर दाखल करा

Next

देसाईगंज नगर परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर नगरसेवकांनी २०११ ते २०१६ या कालावधीत निकषात न बसणाऱ्या नागरिकांनासुद्धा घरकुलांचे वितरण करून गैरव्यवहार केला. याप्रकरणी नगर परिषदेचे तत्कालीन पदाधिकारी, नगरसेवक यांच्यासह १९ जणांविराेधात फाैजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५६ (३)नुसार गुन्हा दाखल करून तपास करावा, अशी तक्रार हिरालाल माेटवानी यांनी १२ डिसेंबर २०१७ राेजी देसाईगंज पाेलीस स्टेशनमध्ये दाखल केली. मात्र, पाेलिसांनी चाैकशी न करताच प्रकरण प्रलंबित ठेवले. त्यामुळे फिर्यादीने न्यायालयात याचिका दाखल केली. देसाईगंज पाेलिसांनी चाैकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला. मात्र, त्यांच्याकडून अहवाल प्राप्त न झाल्यामुळे काेणतीही फाैजदारी कारवाई करण्यात आली नसल्याचे देसाईगंज पाेलिसांनी न्यायालयाला कळविले आहे. तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांविराेधात केलेले आराेप अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत. तसेच प्रकरण अतिशय गुंतागुंत व क्लिष्ट आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखाेल चाैकशी हाेण्याच्या दृष्टीने गैरअर्जदारांविराेधात एफआयआर दाखल करून चाैकशी करावी व एक महिन्याच्या आत अहवाल न्यायालयात सादर करावा, असे आदेश देसाईगंज न्यायालयाने २८ एप्रिल राेजी देसेाईगंज पाेलिसांना दिले आहेत.

Web Title: File an FIR in the Gharkul case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.