क्षेत्र सहायकावर गुन्हा दाखल

By Admin | Updated: August 19, 2014 23:42 IST2014-08-19T23:42:59+5:302014-08-19T23:42:59+5:30

अग्नी संरक्षकाच्या लाईन टाकण्याच्या कामाबाबत मजुरांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या तसेच देयकाची उचल करून शासन प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी मुलचेरा पोलिसांनी मार्र्कंडा (कं.) वनपरिक्षेत्राचे

File a complaint on field assistance | क्षेत्र सहायकावर गुन्हा दाखल

क्षेत्र सहायकावर गुन्हा दाखल

माहितीचा अधिकारात उघड : बनावट स्वाक्षऱ्या करून ३५ हजार हडपले
घोट : अग्नी संरक्षकाच्या लाईन टाकण्याच्या कामाबाबत मजुरांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या तसेच देयकाची उचल करून शासन प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी मुलचेरा पोलिसांनी मार्र्कंडा (कं.) वनपरिक्षेत्राचे क्षेत्र सहायक श्रावण देवाजी खोब्रागडे याच्यावर ४२०, ४६५, ४६६, ४७१, ४७४, ४७७ (अ) व ४०९ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यामुळे वनविभागात खळबळ माजली आहे.
मुलचेरा तालुक्यातील मल्लेरा येथील मोजीकराव गणपत आरके यांनी १४ आॅगस्टला क्षेत्र सहाय्यक श्रावण देवाजी खोब्रागडे यांच्याविरोधात मुलचेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीत मोजीकराव आरके यांनी म्हटले होते की, घोट येथील तरूण शहा हे माझ्या घरी आले व त्यांनी तुम्ही वनविभागात कोपरअल्ली ते मल्लेरा मार्गावर अग्नी संरक्षक लाईनचे काम केले आहे का, अशी विचारणा केली. त्यावर आपण अशा प्रकारचे काम केले कधीही केले नसल्याचे सांगितले. त्यानंतर तरूण शहा यांनी माहितीच्या अधिकारात मागविलेल्या कोपरअल्ली ते मल्लेरा मार्गाच्या अग्नी संरक्षक लाईनच्या कामाच्या देयकाच्या प्रती आपल्याला दाखविल्या. सदर प्रत पाहिली असता, या देयकामध्ये भगवान गणपत चौधरी आणि इतर ७ मजुरांनी २५ जानेवारी २०१३ ते ११ फेब्रुवारी २०१३ या कालावधीत अग्नी संरक्षक लाईनचे काम केल्याचे दिसून आले. तसेच या कामापोटी ३५ हजार ९७१ रूपयाचे देयक मजुरी म्हणून मंजूर करण्यात आल्याचेही देयकाच्या प्रतीमध्ये आढळून आले. दुसऱ्या प्रतीमध्ये मजुरांच्या नावाची यादी होती. या यादीत भगवान चौधरी, अनंतराव बावणे, पुणेश्वर बावणे रा. मल्लेरा तसेच कोपरअल्ली येथील विलास नैताम, साईनाथ मंटकवार, अनिल बुरमवार, खुशाल मंटकवार यांच्यासह माझ्याही नावाचा समावेश असल्याचे दिसून आले. तसेच या देयकामध्ये समावेश असलेल्या सर्व मजुरांच्या बोगस स्वाक्षऱ्या व काही मजुरांचे अंगठेही मारल्याचे दाखविण्यात आले होते. माझ्या नावासमोर ४४७६.४२ रूपयाची तरतूद केली होती, असेही मोजीकराव आरके यांनी तक्रारीत नमुद केले होते. सदर प्रकरणाची पोलिसांनी चौकशी केली असता, तत्कालीन क्षेत्र सहाय्यक श्रावण खोब्रागडे याने बनावट देयक तयार करून रक्कम हडपल्याचे निदर्शनास आले. (वार्ताहर)

Web Title: File a complaint on field assistance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.