शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 05:00 IST

पाथरगोटा येथील शेतकऱी बाजीराव बगमारे हे २ जून राेजी शेतात काम करीत असताना त्यांना विजेचा धक्का लागला व यात त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, त्याच्यात शेतातील अधिकृत विद्युत खांबावरून एका शेजारी शेतकऱ्याने आपल्या शेतात अनधिकृतपणे मोटार पंपला कनेक्शन जाेडले आहे. शेजारील शेतकऱ्याने मोटारपंप कनेक्शनकरिता डिमांड भरले होते; परंतु कनेक्शन अद्यापही मिळाले नाही.

ठळक मुद्देनागरिकांचा महावितरणवर राेष मागणी : पाथरगाेटातील शेतकरी मृत्यू प्रकरण

लाेकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा येथील शेतकऱ्याचा विद्युत धक्क्याने शेतातच मृत्यू झाल्याप्रकरणी योग्य चौकशी करून महावितरण कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पाथरगाेटा येथील नागरिकांनी केली आहे.पाथरगोटा येथील शेतकऱी बाजीराव बगमारे हे २ जून राेजी शेतात काम करीत असताना त्यांना विजेचा धक्का लागला व यात त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, त्याच्यात शेतातील अधिकृत विद्युत खांबावरून एका शेजारी शेतकऱ्याने आपल्या शेतात अनधिकृतपणे मोटार पंपला कनेक्शन जाेडले आहे. शेजारील शेतकऱ्याने मोटारपंप कनेक्शनकरिता डिमांड भरले होते; परंतु कनेक्शन अद्यापही मिळाले नाही. त्यामुळे सबंधित लाईनमनने खांबावर चढून तारांवर बांधणी करून ठेवली होती. शेतात काम करीत असताना शेतकऱ्याला विजेचा धक्का लागला व यातच त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर सदर कनेक्शन कमी करण्यासाठी विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना संपूर्ण तालुक्यातील लाईट घटनेच्या रात्री बारा वाजता बंद करावे लागले होते, हे विशेष. दरवर्षी कुठे ना कुठे अशा प्रकारच्या घटना घडतात. परंतु कारण शाेधले जात नाही. पाथरगाेटा येथील शेतकरी मृत्यू प्रकरणाचा सखोल तपास करून जबाबदार असलेल्या महावितरण कंपनीवर तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृतकाच्या परिवाराला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी कली आहे.

कनेक्शन मिळण्यास दिरंगाई; वीजचाेरी वाढलीमहावितरण कंपनीच्या एका लाईनमनने पाथरगाेटा येथील मृत शेतकऱ्यांच्या अधिकृत खांबावरून थेट वायरची जाेडणी दुसऱ्याच्या शेतात केली हाेती. याद्वारे दुसरा शेतकरी पीक काढत हाेता. महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना कृषिपंप जाेडणी देण्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अनेक शेतकरी पीक वाचविण्यासाठी चाेरीची वीज वापरतात. यातूनच विजेसंदर्भात अपघात घडतात. कनेक्शन मिळण्यास दिरंगाई हाेत असल्याने अनेक शेतकरी चाेरीची वीज वापरतात.

महावितरण कंपनीचे कोणतेही कर्मचारी शेतकऱ्यांना विद्युत मोटारपंपाकरिता वीज खांबावरून अवैधरित्या वीज कनेक्शन जोडून देत नाही. पाथरगाेटा येथील प्रकरण नेमके काय आहे, याबाबतची सविस्तर चौकशी करून कार्यवाही केली जाईल. - ए. बी.बोरकर, शाखा अभियंता महावितरण, आरमोरी

 

टॅग्स :electricityवीज