काेराेनामुळे १५ जणांनी गमावला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:36 IST2021-04-18T04:36:52+5:302021-04-18T04:36:52+5:30

एकूण काेराेनाबाधितांची संख्या १४ हजार ४८५ झाली आहे. त्यापैकी ११ हजार ४६६ बाधितांनी काेराेनावर मात केली आहे. तसेच २ ...

Fifteen people lost their lives due to Kareena | काेराेनामुळे १५ जणांनी गमावला जीव

काेराेनामुळे १५ जणांनी गमावला जीव

एकूण काेराेनाबाधितांची संख्या १४ हजार ४८५ झाली आहे. त्यापैकी ११ हजार ४६६ बाधितांनी काेराेनावर मात केली आहे. तसेच २ हजार ८१९ सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकूण २०० जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

नवीन मृत्यूमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील कढोली येथील ६६ वर्षीय पुरुष, गडचिरोली शहरातील गोकुलनगर येथील ४३ वर्षीय महिला, गडचिरोली येथील नवेगाव कॉम्प्लेक्स येथील ६३ वर्षीय पुरुष, कुरखेडा तालुक्यातील ३६ वर्षीय पुरुष, चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका नागभीड येथील ५५ वर्षीय पुरुष, पवनी येथील ३५ वर्षीय पुरुष, लाखांदुर येथील येथील ३५ वर्षीय महिला, कुरखेडा येथील ५३ वर्षीय महिला, आरमोरी तालुक्यातील ५६ वर्षीय पुरुष, ब्रम्हपुरी येथील ५८ वर्षीय पुरुष, आरमोरी तालुक्यातील ६० वर्षीय महिला, गडचिरोली येथील ४८ वर्षीय महिला, गडचिरोली येथीलच ५५ वर्षीय पुरुष तर जिल्हा भंडारा तालुका लाखांदुर येथील ६० वर्षीय महिलेचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.१६ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण १९.४६ टक्के तर मृत्यू दर १.३८ टक्के झाला.

नवीन ४६६ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १९६, अहेरी ३३, आरमोरी ३५, भामरागड ५, चामोर्शी २४, धानोरा तालुक्यातील ८, एटापल्ली २१, कोरची ३३, कुरखेडा ४४, मूलचेरा १४, सिरोंचा ११ तर देसाईगंज तालुक्यातील बाधितांमध्ये ४२ जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या २१८ रूग्णांमध्ये गडचिरोली मधील ८१, अहेरी २३, आरमोरी ११, भामरागड ३०, चामोर्शी ६, धानोरा १३, एटापल्ली १३, सिरोंचा १२, कोरची ९, कुरखेडा ३, तसेच देसाईगंज तालुक्यातील १७ जणांचा समावेश आहे.

बाॅक्स

मृत्यूचे सत्र थांबणार काय?

पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत काेराेना रूग्णांची संख्या अतिशय झपाट्याने वाढत चालली आहे. दर दिवशी काेराेनाबाधितांच्या संख्येत रेकाॅर्डब्रेक वाढ हाेत आहे. सरकार मार्फत विविध उपाययाेजना केल्यानंतरही काेराेना बाधितांची संख्या वाढत आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे. तरीही काही नागरिक बिनधास्तपणे रस्त्यावर फिरत आहेत. त्यांच्यावर दंड आकारण्याबराेबर गुन्हा दाखल करण्याची गरज आहे. अन्यथा नागरिक पाेलिसांनाही जुमानणार नाही.

Web Title: Fifteen people lost their lives due to Kareena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.