भरधाव ट्रकने बालकास चिरडले

By Admin | Updated: September 17, 2014 23:48 IST2014-09-17T23:48:45+5:302014-09-17T23:48:45+5:30

गडचिरोली नजीकच्या कनेरी येथील वायुनंदना पॉवर प्लॅन्टसाठी कोंडा घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रकने खेळत असलेल्या सात वर्षीय बालकास चिरडल्याची घटना धानोरा-गडचिरोली आंतरराज्यीय

The fierce truck crushed the child | भरधाव ट्रकने बालकास चिरडले

भरधाव ट्रकने बालकास चिरडले

मुरूमगाव : गडचिरोली नजीकच्या कनेरी येथील वायुनंदना पॉवर प्लॅन्टसाठी कोंडा घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रकने खेळत असलेल्या सात वर्षीय बालकास चिरडल्याची घटना धानोरा-गडचिरोली आंतरराज्यीय महामार्गावर मुरूमगाव येथील महावितरण कार्यालयाच्यासमोर सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
हर्षद गंगाधर कोमा रा. मुरूमगाव असे या अपघातात ठार झालेल्या बालकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार एमएच - ४० वाय- २२१९ हा ट्रक कोंडा घेऊन संबळपूरवरून गडचिरोली-धानोरा या आंतरराज्यीय महामार्गावरून येत होता. दरम्यान या ट्रकने ७ वर्षीय बालकास जबर धडक दिली. यात हर्षद कोमा हा बालक जागीच ठार झाला. तो इयत्ता पहिलीमध्ये जि. प. प्राथमिक शाळेत शिकत होता. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळावर एकच गर्दी केली. ट्रक चालकास तत्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी नागरिक संतप्त झाले. त्यांनी राजनांदगाव-मुरूमगाव-धानोरा-गडचिरोली या आंतरराज्यीय महामार्गावरची वाहतूक एक तास रोखून धरली. त्यानंतर मुरूमगाव पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक एस. टी. गढवी हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळावर हजर झाले. त्यांनी ट्रकचालक मुक्तेश्वर जीवराज मसराम याला अटक केली. अपघातग्रस्त ट्रकही ताब्यात घेतला. पोलिसांनी ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गढवी करीत आहेत. यापूर्वीही या ठिकाणी दोन अपघात घडले होते. या मार्गावरील वाहतूक वाढली असल्यामुळे मुरूमगाव येथील महावितरण कार्यालयासमोर गतीरोधक उभारण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी धानोराच्या उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांनी ताब्यात घेतलेले ट्रकचे मालक पंकज साहू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (वार्ताहर)

Web Title: The fierce truck crushed the child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.