गडचिरोली : वन जमिनीवर अवैधपणे काम करत असल्याचा बनाव रचून जप्त केलेला ट्रॅक्टर सोडण्यासाठी आणि दंड कमी करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सिरोंचा वनविभागातील एका क्षेत्र सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. महेश जयंतराव धामनगे (४७) असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून, २१ जानेवारी रोजी माओवादप्रभावित राजाराम उपक्षेत्रात ही कारवाई करण्यात आली.तक्रारदार हे तेलंगणा राज्यातील रहिवासी आहेत. ते राजाराम (खांदला) परिसरात आपल्या काकांच्या ट्रॅक्टरने शेतकऱ्यांच्या शेताची मशागत करण्याचे काम करत होते. दरम्यान, दोन वनरक्षकांनी 'वनजमिनीवर अवैध काम' करत असल्याचा ठपका ठेवत ट्रॅक्टर जप्त केला. हा जप्त केलेला ट्रॅक्टर सोडण्यासाठी आणि गुन्हा दाखल न करता दंड कमी करण्यासाठी क्षेत्र सहायक महेश धामनगे याने तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.नक्षलग्रस्त भागात एसीबीचा 'सापळा'
लाचेची मागणी होताच तक्रारदाराने गडचिरोली एसीबीकडे धाव घेतली. एसीबीने तक्रारीची गुप्तपणे शहानिशा केली असता, १० हजार रुपये घेण्याचे निश्चित झाले. बुधवारी (दि. २१) अत्यंत दुर्गम आणि नक्षलप्रभावित असलेल्या राजाराम (खांदला) उपक्षेत्रात एसीबीच्या पथकाने सापळा रचला. लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने धामनगेला रंगेहाथ पकडले.घरांची घेतली झडती
एसीबीने आरोपी महेश धामनगे याच्या राजाराम (खांदला) आणि चंद्रपूर येथील निवासस्थानांचीही झडती घेतली. या झडतीमध्ये काय निष्पन्न होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आरोपीविरुद्ध राजाराम (खांदला) उपपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोणत्याही शासकीय कामासाठी अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी न घाबरता एसीबीशी संपर्क साधावा. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी जनतेचे सहकार्य महत्त्वाचे आहे- विक्रांत सगणे, उपअधीक्षक एसीबी, गडचिरोली.
Web Summary : Gadchiroli forest officer arrested for accepting ₹10,000 bribe to release a seized tractor. The officer demanded money to reduce the fine for illegal land cultivation. ACB laid a trap in a Naxal-affected area and caught him. His residences were searched.
Web Summary : गढ़चिरौली में वन अधिकारी जब्त ट्रैक्टर को छुड़ाने के लिए 10,000 रुपये की रिश्वत लेते गिरफ्तार। अधिकारी ने अवैध भूमि की खेती के लिए जुर्माना कम करने के लिए पैसे मांगे थे। एसीबी ने नक्सल प्रभावित क्षेत्र में जाल बिछाकर उसे पकड़ा। उसके आवासों की तलाशी ली गई।