सिरोंचा नगर पंचायतीत फायबर बोट दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:01 IST2020-02-09T05:00:00+5:302020-02-09T05:01:04+5:30

पूल झाल्यापासून डोंग्याचा प्रवास जवळपास बंद झाला आहे. तरीही काही नागरिक नदी पात्रात मासेमारी करण्यासाठी जातात. तसेच महिला धोबी घाटावर कपडे धुण्यासाठी जातात. उन्हाळ्यात नदी पात्रातून कमी पाणी राहत असल्याने पुलावरून फेरी मारून जाण्यापेक्षा काही नागरिक नदीतूनच प्रवास करतात.

Fiber boats are lodged in the city of Sirion | सिरोंचा नगर पंचायतीत फायबर बोट दाखल

सिरोंचा नगर पंचायतीत फायबर बोट दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : सिरोंचा शहर नद्यांनी वेढले आहे. नदीच्या पाण्यात बुडून अनुचित घटना घडतात. अशावेळी मदत मिळावी, यासाठी सिरोंचा नगर पंचायतीला १५ लाख रुपये किमतीची फायबर बोट उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सिरोंचा शहराजवळून गोदावरी व प्राणहिता नदी वाहते. नद्यांवर पुलांचे बांधकाम होण्यापूर्वी नागरिक नदीतूनच डोंग्याने प्रवास करीत होते. पूल झाल्यापासून डोंग्याचा प्रवास जवळपास बंद झाला आहे. तरीही काही नागरिक नदी पात्रात मासेमारी करण्यासाठी जातात. तसेच महिला धोबी घाटावर कपडे धुण्यासाठी जातात. उन्हाळ्यात नदी पात्रातून कमी पाणी राहत असल्याने पुलावरून फेरी मारून जाण्यापेक्षा काही नागरिक नदीतूनच प्रवास करतात. अशावेळी पाण्यात बुडण्याच्या अनुचित घटना घडण्याची शक्यता शक्यता राहते. यापूर्वीही नदी पात्रांमध्ये जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. वेळेवर मदत मिळावी, यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने फायबर बोट उपलब्ध करून दिली आहे. सदर बोट नगर पंचायतीच्या आवारात ठेवण्यात आली आहे. बोटीमुळे वेळेवर मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Fiber boats are lodged in the city of Sirion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.