माेहटाेला परिसरात तापाची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:37 IST2021-04-24T04:37:40+5:302021-04-24T04:37:40+5:30
देसाईगंज शहरासह विसोरा, बोडधा आणि कसारी गावात काेराेनाबाधित रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे प्रत्येकच व्यक्ती स्वतःची व कुटुंबांची काळजी ...

माेहटाेला परिसरात तापाची साथ
देसाईगंज शहरासह विसोरा, बोडधा आणि कसारी गावात काेराेनाबाधित रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे प्रत्येकच व्यक्ती स्वतःची व कुटुंबांची काळजी घेत आहे. मोहटोला, किन्हाळा, डोंगरगाव (ह.), अरततोंडी, चिखली रीठ, चिखली तुकूम, पोटगाव, पिंपळगाव (ह.), विठ्ठलगाव व विहीरगाव आदी गावात ताप, सर्दी व खोकल्याचे एक घर आड रुग्ण फणफणत आहेत. काेराेना टेस्ट केली व अहवाल पाॅझिटिव्ह आला तर रुग्णालयात भरती व्हावे लागते, या भीतीने संबंधित रुग्ण तपासणीकरिता जात नाही. त्यामुळे येत्या दिवसात संबंधित गावात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
बाॅक्स
घराेघरी जाऊन टेस्ट करणे शक्य नाही
याबाबत पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी श्रावण सलाम व तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. अभिषेक कुमरे यांना विचारले असता विहीरगाव येथे आरोग्य पथक कार्यरत असून तेथे तपासणी केंद्र आहे. लोकांनी तेथे जाऊन आपापली तपासणी करून घ्यावी. आलेल्या रिपोर्टनुसार वैद्यकीय सल्ला देण्यात येईल. अपुरे मनुष्यबळ असल्याने घरोघरी जाऊन काेराेना टेस्ट करणे शक्य नाही, असे त्यांनी सांगितले.