गडचिरोलीत महिला नक्षलीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2022 22:30 IST2022-08-04T22:28:33+5:302022-08-04T22:30:12+5:30
Gadchiroli News नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी (दि. ३) एटापल्ली तालुक्यात केलेल्या नाकाबंदीदरम्यान एका महिला नक्षलीला अटक करण्यात पाेलिसांना यश आले.

गडचिरोलीत महिला नक्षलीला अटक
गडचिराेली : नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी (दि. ३) एटापल्ली तालुक्यात केलेल्या नाकाबंदीदरम्यान एका महिला नक्षलीला अटक करण्यात पाेलिसांना यश आले. मुडे हिडमा मडावी असे तिचे नाव असून ती कसनसूर दलमची सदस्य असल्याचे पाेलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा स्पष्ट केले.
मूळची छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्याची रहिवासी असलेल्या मुडे मडावी हिच्यावर राज्य शासनाने दाेन लक्ष रुपयांचे इनाम ठेवले हाेते. तिचा काेणकाेणत्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे, याचा तपास गडचिराेली पाेलिसांकडून सुरू आहे. एटापल्ली पाेलिसांना सदर महिलेच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यावरून तिला ताब्यात घेऊन चाैकशी केली असता ती महिला नक्षली असल्याचे स्पष्ट झाले.