सत्कार मूर्ती सामाजिक मनाचे राजकीय साधू- मुनगंटीवार
By Admin | Updated: January 17, 2016 00:58 IST2016-01-17T00:58:55+5:302016-01-17T00:58:55+5:30
पालकमंत्री मुनगंटीवार पुढे म्हणाले, ज्या तिघांचाही सन्मान झाला ते सामाजिक मनाचे राजकीय साधू आहेत.

सत्कार मूर्ती सामाजिक मनाचे राजकीय साधू- मुनगंटीवार
चंद्रपूर : पालकमंत्री मुनगंटीवार पुढे म्हणाले, ज्या तिघांचाही सन्मान झाला ते सामाजिक मनाचे राजकीय साधू आहेत. त्यांनी सतत सज्जनपणे कार्य केले. चांगल्या माणसांना नेहमी चांगलेच दिसत असते. शांताराम पोटदुखे यांनी अशा आयोजनातून चांगल्या मनाला शक्ती देण्याचे कार्य केले, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
अध्यक्षीय भाषणातून शांताराम पोटदुखे यांनी लोकसेवा व विकास संस्थेच्या वाटचालीचा धावता आलेख मांडला. दरवर्षी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. निर्मला प्रभावळकर यांनी पुरस्कार स्विकारल्यामळे हा पुरस्कार मोठा झाला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
समाररंभादरम्यान कस्तुरबा गांधी स्मृती पुरस्कार डॉ.निर्मला सामंत प्रभावळकर, कर्मवीर दादासाहेब कन्नमवार स्मृती पुरस्कार प्रभाकर मामुलकर, माजी आमदार स्व.बाबुराव पोटदुखे स्मृती विशेष पुरस्कार संजय देवतळे यांना देऊन सन्मानित करण्यात आले. प्रस्ताविक प्रशांत पोटदुखे, तर संचालन प्रा.स्वप्नील माधमशेट्टीवार यांनी केले. आभार उप प्राचार्य डॉ.आर.पी.इंगोले यांनी मानले. समारंभाला प्रतिष्ठीत नागरिक, प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)