शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

तुळशीत जवानांच्या माता-पित्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 01:35 IST

येथील गाव विकास युवक मंडळाच्या वतीने देशसेवा करीत असलेल्या गावातील जवानांच्या माता-पित्यांचा व गाव विकासात महत्वाचे योगदान दिलेल्या गावातील व्यक्तींचा तसेच गुणवताप्राप्त विद्यार्थ्यांच्या पित्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देयुवक मंडळाचा पुढाकार : शिवजयंतीच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कतुळशी : येथील गाव विकास युवक मंडळाच्या वतीने देशसेवा करीत असलेल्या गावातील जवानांच्या माता-पित्यांचा व गाव विकासात महत्वाचे योगदान दिलेल्या गावातील व्यक्तींचा तसेच गुणवताप्राप्त विद्यार्थ्यांच्या पित्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शिवजयंतीनिमित्त मंगळवारी घेण्यात आलेला हा कार्यक्रम कौतुकाचा विषय ठरला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रेखा तोंडफोडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपसरपंच मुरलीधर दुनेदार, ग्रा.पं. सदस्य सत्यवान लोणारे, भारिप-बमसंचे पदाधिकारी नसीर जुम्मन शेख, सुरेश नागरे, उर्वशी राऊत, सुमित्रा मारबते, चित्रकला लोणारे, तंमुस अध्यक्ष मधुकर सुकारे, पोलीस पाटील तेजस्वीनी दुनेदार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नेताजी दुनेदार, एकनाथ वघारे, उमाजी दुनेदार, विजय लोणारे, माजी सरपंच वाय. बी. मेश्राम, बंडू सुकारे, पद्माकर राऊत, राजेश मारबते, लंकेश्वर पत्रे, केवळराम दोनाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी विविध संरक्षण दलात देशसेवा करीत असलेल्या जवानांचे माता पिता गुणाजी राऊत, कौसल्या राऊत, डॉ.माणीक सहारे, रघुनाथ रामटेके आदींचा सत्कार करण्यात आला. तसेच माजी सरपंच उमाकांत कुळमेथे, सेवानिवृत्त पोलीस पाटील कान्हाजी दुनेदार, माजी सरपंच कविश्वर दुनेदार, सामाजिक कार्यकर्ते राघोबा शेंडे, सेवानिवृत्त शिक्षक वसंतराव मिरगे, भिमराव वाघाडे, नथ्थु दुनेदार, शरद वाघाडे, माणिक दोनाडकर, यशवंत दोनाडकर, निलकंठ मारबते, अन्नाजी पत्रे, ऋषी दुनेदार, उमाजी चंडीकार, शामराव सोनवाने, नामदेव नेवारे, मदन सुकारे, सुरेश वझाडे, दिनकर सुकारे, महादेव ठाकरे यांचाही सत्कार करण्यात आला .याप्रसंगी विद्यार्थ्यांसाठी अ आणि ब अशा दोन गटात वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत अ गटातून प्रथम क्रमांक ईशा विजय लोणारे, द्वितीय क्रमांक कावेरी सुभाष दुनेदार, तृतीय क्रमांक आस्था मुन्ना लांडगे हिने मिळविला. ब गटातून प्रथम क्रमांक वैष्णवी प्रकाश पत्रे, द्वितीय यशश्री पुरुषोत्तम वाघाडे, तृतीय कुणाल दिलीप राऊत यांनी मिळवला. परीक्षक म्हणून पंकज धोटे, प्रदीप तुपट, कैलास गजापूरे यांनी काम पाहीले.कार्यक्रमाचे संचालन विष्णू दुनेदार यांनी केले. कार्यक्रमासाठी गाव विकास युवक मंडळाच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.