नक्षल्यांना ठार करणाऱ्या पोलीस जवानांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 23:49 IST2017-12-22T23:48:55+5:302017-12-22T23:49:14+5:30

Felicitated police jawans who killed Maoists | नक्षल्यांना ठार करणाऱ्या पोलीस जवानांचा सत्कार

नक्षल्यांना ठार करणाऱ्या पोलीस जवानांचा सत्कार

ठळक मुद्देपोलीस महासंचालकांनी केला गौरव

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील कल्लेड जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवून सात नक्षल्यांचा खात्मा करणाºया १९ पोलीस जवानांसह सी-६० पथकाचे प्रमुख मोतिराम मडावी यांचा राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांच्या हस्ते गुरूवारी सत्कार करण्यात आला. त्यांना वेगवर्धीत पदोन्नतीचा लाभ दिल्या जाणार आहे.
यावेळी अप्पर मुख्य सचिव (गृह) सुधीरकुमार श्रीवास्तव, नक्षलविरोधी अभियानचे अप्पर पोलीस महासंचालक डी. कनकरत्नम, विशेष पोलीस महानिरिक्षक (नक्षल विरोधी अभियान) शरद शेलार, पोलीस उपमहानिरिक्षक अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) महेश्वर रेड्डी, अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) महेंद्र पंडीत आदी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी पोलीस महासंचालकांनी जवानांनी दाखविलेल्या शौर्याचे कौतुक केले.

Web Title: Felicitated police jawans who killed Maoists