काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2017 02:03 IST2017-03-02T02:03:00+5:302017-03-02T02:03:00+5:30
तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आरमोरी येथे काँग्रेसच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती

काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार
आरमोरीत बैठक : आनंदराव गेडाम यांनी केले कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
आरमोरी : तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आरमोरी येथे काँग्रेसच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार मंगळवारी करण्यात आला.
यावेळी अध्यक्षस्थानी माजी आ. आनंदराव गेडाम होते. प्रमुख अतिथी म्हणून देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर वनमाळी, माजी जि. प. सभापती आनंदराव आकरे, पुंडलिक लाकडे, माजी पं. स. सभापती बग्गूजी ताडाम, चंदू वडपल्लीवार, हिरेंद्र भजभुजे, तुळशिदास काशिकर, दत्तू सोमनकर, दिलीप फुलबांधे, ईश्वर लाकडे, हेमराज दामले, युवक काँग्रेसचे अध्यक्ष मिलींद खोब्रागडे, दिलीप घोडाम आदी उपस्थित होते. याप्रसंगी माजी आ. आनंदराव गेडाम यांच्या हस्ते नवनिर्वाचित जि. प. सदस्य मनीषा दोनाडकर, वनीता सहाकाटे, पं. स. सदस्य वृंदा गजभिये, नर्मदा काशिकर, बबीता उसेंडी, विनोद बावनकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी आ. आनंदराव गेडाम म्हणाले, मागील २०१२ च्या जि. प. निवडणुकीत १६ पैकी ५ सदस्य काँग्रेसचे निवडून आले होते. यावर्षी ६ उमेदवार या क्षेत्रातून निवडून आले आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्ष आणखी एक पाऊल पुढे आहे. काँग्रेसची विचारधारा सर्वसामान्यांना पटत असल्याने काँग्रेसचा जनाधार आजही कायम आहे, असे ते म्हणाले. याप्रसंगी किशोर वनमाळी यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक बग्गूजी ताडाम, संचालन प्रा. शशिकांत गेडाम यांनी केले तर आभार मिलींद खोब्रागडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सुभाष सपाटे, अशोक भोयर, दीपक दुपारे, प्रवीण रहाटे, तुळशिदास काशिकर, बेबी सोरते, रवींद्र नैताम, नामदेव सोरते आदी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)