काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2017 01:21 IST2017-02-27T01:21:04+5:302017-02-27T01:21:04+5:30
तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवारी कुरखेडा येथे काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद

काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार
कुरखेडात : आनंदराव गेडाम यांच्या उपस्थितीत कार्यक्रम
कुरखेडा : तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवारी कुरखेडा येथे काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार आनंदराव गेडाम होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट, ज्येष्ठ नेते निताराम कुमरे, तालुका काँग्रेस अध्यक्ष जयंत हरडे, पं.स. सदस्य महादेव नाकाडे, न.पं. सभापती आशा तुलावी, नगरसेवक मनोज सिडाम, हिराजी माकडे, साबू पठाण, बबलू शेख यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात पलसगड-पुराडा क्षेत्रातून जि.प.वर निवडून आलेले प्रभाकर तुलावी, गेवर्धा-गोठणगाव विजयी झालेले प्रल्हाद कराडे तसेच नवनिर्वाचित पं.स. सदस्य मनोज दुनेदार, गिरीधारी तितराम, संध्या नैताम, शारदा पोरेटी, सुनंदा हलामी यांचा शाल श्रीफळ देऊन आनंदराव गेडाम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंत हरडे तर संचालन सिराज पठाण यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)