आंतरराष्टÑीय मंचद्वारे अर्जुनवार यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 23:21 IST2017-09-14T23:21:12+5:302017-09-14T23:21:42+5:30
जिल्ह्यात मागील २८ वर्षांपासून सामाजिक, राजकीय तसेच शैक्षणिक, आरोग्य, महिला सक्षमीकरण यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ....

आंतरराष्टÑीय मंचद्वारे अर्जुनवार यांचा सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात मागील २८ वर्षांपासून सामाजिक, राजकीय तसेच शैक्षणिक, आरोग्य, महिला सक्षमीकरण यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल एकता सामाजिक शिक्षण संस्थेचे प्रकाश अर्जुनवार यांचा दिल्ली येथे नुकताच सत्कार करण्यात आला.
नेपाळच्या उपराष्टÑपतींचे राजनितीक सल्लागार यांच्याद्वारे आठ देशांच्या सार्क परिषदेकरिता विशेष सल्लागार या पदावर नियुक्ती झाल्यामुळे आंतरराष्टÑीय समरसता मंच व इंडो-नेपाल समरसता आॅर्गनायझेशनद्वारे दिल्ली येथील सर्वाेच्च न्यायालयासमोरील मेनन सभागृहात प्रकाश अर्जुनवार यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दिल्लीचे माजी राज्यपाल तजेंदर खन्ना, नेपाळच्या उपराष्टÑपतींचे राजनितीक सल्लागार महावीर प्रसाद टोरडी, फॉर्मास्युटीकल सायन्स अँड रिसर्च युनिव्हरर्सिटी आॅफ इंडियाचे उपकुलपती डॉ. रमेश गोयल, सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता अॅड. ए. पी. सिंह, सुनील दत्त शर्मा, मनोज राजन उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रकाश अर्जुनवार यांचा शाल तसेच प्रतिभा सन्मान प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.