१७ लाखांच्या बारदाण्याची अफरातफर

By Admin | Updated: July 7, 2014 23:34 IST2014-07-07T23:34:21+5:302014-07-07T23:34:21+5:30

येथील आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयातून १७ लाख ६१ हजार ३०० रूपये किमतीच्या बारदाण्याची अफरातफर झाल्याची बाब माहितीच्या अधिकारांतर्गत मागितलेल्या

Fate of Rs 17 lakhs | १७ लाखांच्या बारदाण्याची अफरातफर

१७ लाखांच्या बारदाण्याची अफरातफर

कोरची : येथील आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयातून १७ लाख ६१ हजार ३०० रूपये किमतीच्या बारदाण्याची अफरातफर झाल्याची बाब माहितीच्या अधिकारांतर्गत मागितलेल्या माहितीवरून उघडकीस आली आहे.
प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील मोहगाव येथील रूखमन घाट घुमर यांनी १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या एका वर्षाच्या कालावधीतील बारदान्याची माहिती माहितीच्या अधिकारात कोरचीच्या उपप्रादेशिक कार्यालयामधून मागितली होती. कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील उपप्रादेशिक कार्यालयामधून धान खरेदी केंद्रावर बारदाना पुरविल्या जातो. महामंडळाच्या नाशिकच्या कार्यालयातून उपप्रादेशिक कार्यालयाला बारदाण्याचा पुरवठा होत असतो. महामंडळ कंपनीकडून सदर बारदाणा ४२.४० रूपये प्रती नग प्रमाणे खरेदी करते. ज्यावेळी बारदाना महामंडळाच्या कार्यालयातून कोरची येथील उप्रादेशिक कार्यालयाच्या गोडाऊनमध्ये येतो. त्यावेळी आवकजावक रजिस्टरवर त्याची नोंदही करण्यात येत नसल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे. १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी २०१४ दरम्यान २५ हजार ५०० एवढा जुना बारदाना धान खरेदी केंद्राला वाटप केल्याची नोंद आहे. मात्र संबंधित केंद्र संचालकांना विचारणा केली असता, बारदाणा मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. उपप्रादेशिक व्यवस्थापक आर. बी. उईके यांनी वर्षभरात १७ लाख ६१ हजारर ३०० रूपये किमतीच्या बारदाण्याची अफरातफर केल्याची माहिती मिळालेल्या दस्तऐवजावरून स्पष्ट होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Fate of Rs 17 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.