विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू
By Admin | Updated: December 3, 2014 22:49 IST2014-12-03T22:49:39+5:302014-12-03T22:49:39+5:30
जिल्ह्यातील आदिवासी व गैरआदिवासी नागरिकांच्या न्याय हक्कासाठी विविध मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अहेरी जिल्हा कृती समिती एटापल्लीच्यावतीने येथील इंदिरा गांधी

विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू
निवेदन दिले: इंदिरा गांधी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय गजबजले
गडचिरोली : जिल्ह्यातील आदिवासी व गैरआदिवासी नागरिकांच्या न्याय हक्कासाठी विविध मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अहेरी जिल्हा कृती समिती एटापल्लीच्यावतीने येथील इंदिरा गांधी चौकात तर राष्ट्रीय जनहितवादी युवा समिती एटापल्लीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज बुधवारपासून बेमूदत उपोषण सुरू करण्यात आले.
येथील इंदिरा गांधी चौकात अहेरी जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष प्रज्ज्वल नागुलवार यांच्या नेतृत्वात एटापल्ली भागातील अनेक नागरिक बेमुदत उपोषणाला बसले आहेत. तर सुरेश बारसागडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अहेरी व एटापल्ली भागातील अनेक नागरिक उपोषणाला बसले आहेत.
जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्प तत्काळ मार्गी लावावे, विदर्भ राज्याची निर्मिती करावी, बांबू व इतर गौण खनिजाचे व्यवस्थापन व विक्री करण्याचे अधिकार ग्रामसभांना देण्यात यावे, सामूहिक व वैयक्तिक वनहक्क दावे तत्काळ निकाली काढावे आदीसह विविध ५१ मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. चौकातील उपोषणात अविनाश लटारे, रानु गोटा, डुंगा आतलामी, राजु खलको, राखी एक्का, उस्काल मिंज, अपेरा कंगाली, सोनु गोटा, मालु पुंगाटी आदी सहभागी झाले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)