शेतजमीन मेडिगड्डाच्या पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 06:00 AM2019-09-11T06:00:00+5:302019-09-11T06:00:38+5:30

मेडिगड्डा धरण भरल्यानंतर या धरणाचे पाणी एकावेळी सोडले जात आहे. पाण्याचा प्रवाह अधिक राहत असल्याने नदीची दरड कोसळत चालली आहे. दिवसेंदिवस दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. दरड कोसळल्यामुळे नदीकाठची जमीन नदीत विलीन होत आहे. अनेक शेतकरी भूमीहीन होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

The farmland under the water of Madigdad | शेतजमीन मेडिगड्डाच्या पाण्याखाली

शेतजमीन मेडिगड्डाच्या पाण्याखाली

Next
ठळक मुद्देमोबदला देण्याची मागणी : पिकांसह जमीन खरडून जात असल्याने नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
अंकिसा : तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर बांधलेल्या मेडिगड्डा सिंचन प्रकल्पाच्या पाण्यामुळे आसरअल्ली, अंकिसा, गुमलकोंडा परिसरातील शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन खरडून जात आहे. त्यामुळे अनेकांचे मोठे नुकसान होत आहे.
मेडिगड्डा धरण भरल्यानंतर या धरणाचे पाणी एकावेळी सोडले जात आहे. पाण्याचा प्रवाह अधिक राहत असल्याने नदीची दरड कोसळत चालली आहे. दिवसेंदिवस दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. दरड कोसळल्यामुळे नदीकाठची जमीन नदीत विलीन होत आहे. अनेक शेतकरी भूमीहीन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून जात आहे, अशा शेतकºयांना जमिनीचा मोबदला देण्याची मागणी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर पुलगम यांनी केली आहे.
धरणापासून १० ते १५ किमी अंतरावरील शेतकºयांना याचा फटका बसत आहे. अंकिसा परिसरातील नडीकुडा, कोतापल्ली, चिंत्तारवेला, अंकिसा, लक्ष्मीदेवीपेठा, गेर्रापल्ली, बोराईगुडम, आसरअल्ली, सुनकरअल्ली, टेकडामोटला, गुमलकोंडा या गावांना धरणग्रस्त गावे म्हणून घोषित करावी. कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणी समय्या तोरकर, सडवली गुडूरी, दामोधर सिपीडी, पापया पाले, धर्मया कोठारी, नारायण पाले, जयराम चौधरी या शेतकºयांनी केली आहे.
संबंधित शेतकºयांना मोबदला न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे. महाराष्टÑ शासनाच्या सहमतीने तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर धरण बांधले आहे. या धरणामुळे जे काही नुकसान होणार आहे, त्यासाठी पाठपुरावा करून मदत मिळवून देण्याची जबाबदारी महाराष्टÑ शासनाची आहे. शेतकºयांच्या मागणीला तेलंगणा सरकार भीक घालणार नाही. त्यामुळे महाराष्टÑ शासनाने मध्यस्ती करावी, अशी मागणी आहे.

Web Title: The farmland under the water of Madigdad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.