सावकारांचा शेतकऱ्यांना ठेंगा; व्यापाऱ्यांना कर्ज

By Admin | Updated: March 18, 2015 01:42 IST2015-03-18T01:42:25+5:302015-03-18T01:42:25+5:30

राज्य शासनाकडून काही खासगी लोकांना सावकारी परवाना दिला जातो. गडचिरोली जिल्ह्यात ५४ परवानाधारक सावकार आहे.

Farmers will hit farmers; Loans to Traders | सावकारांचा शेतकऱ्यांना ठेंगा; व्यापाऱ्यांना कर्ज

सावकारांचा शेतकऱ्यांना ठेंगा; व्यापाऱ्यांना कर्ज

दिगांबर जवादे गडचिरोली
राज्य शासनाकडून काही खासगी लोकांना सावकारी परवाना दिला जातो. गडचिरोली जिल्ह्यात ५४ परवानाधारक सावकार आहे. या सर्व सावकारांनी मागील एक वर्षात नोकरदारांना भरगच्च कर्ज वाटप केल्याची माहिती पुढे आली आहे. या खासगी सावकारांनी सात कोटींच्या वर कर्जाचे वितरण जिल्ह्यातील नोकरदार लोकांना केले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी खासगी सावकारांकडून कर्ज घेतले आहे. त्यांचे संपूर्ण कर्ज शासन भरेल, असे आश्वासन विधानसभेत दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना आता सावकाराचे कर्ज भरण्याची गरज राहणार नाही. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात सावकारांनी शेतकऱ्यांना किती कर्ज वितरण केले, याची माहिती जाणून घेतली असता, ५४ पैकी एकाही परवानाप्राप्त सावकाराने जिल्ह्यातील कोरडवाहू व ओलीत शेती असलेल्या शेतकऱ्याला कर्ज वाटप केले नसल्याची माहिती पुढे आली आहे. या सर्व परवानाप्राप्त सावकारांनी सात कोटी एक लाख ७४ हजार रूपयांचे कर्ज मागील एक वर्षात चार तालुक्यांमध्ये नोकरदारांना वितरित केल्याची माहिती सहायक निबंधक कार्यालयाने दिली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली, कुरखेडा, आरमोरी, देसाईगंज या चार तालुक्यात ५४ परवानाप्राप्त सावकार आहे. यामध्ये गडचिरोलीत पाच, कुरखेडात १३, आरमोरीत ११, देसाईगंजमध्ये २५ सावकारांचा समावेश आहे. या सावकारांनी गतवर्षी १६ हजार ९०५ नागरिकांना कर्ज पुरवठा केला. एकूण सात कोटी १३ लाख ९ हजार रूपयांचे कर्ज वितरण त्यांनी गेल्या वर्षी केले. तर यंदा १२ हजार ७१६ नागरिकांना सात कोटी एक लाखांचे कर्ज वितरण केले. सर्वाधिक कर्ज वितरण देसाईगंज येथील परवानाप्राप्त सावकारांनी नागरिकांना केलेले आहे. एकाही शेतकऱ्याला या सावकारांनी कर्ज दिल्याची माहिती शासनदप्तरी नोंद नाही. त्यामुळे जिल्ह्यातील एकाही परवानाप्राप्त सावकाराला शासनाच्या निर्णयाचा लाभ होणार नाही, अशी माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली आहे. परवानाप्राप्त सावकार मौल्यवान वस्तू गहाण ठेवूनही कर्ज वितरण करतात. त्यामुळे नोकरदार त्यांच्याकडे जातात व सुलभपणे कर्ज घेतात, अशी माहिती लोकमतला मिळाली आहे.

Web Title: Farmers will hit farmers; Loans to Traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.