पट्टा पद्धतीकडे शेतकऱ्यांचा कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:00 IST2020-07-25T05:00:00+5:302020-07-25T05:00:49+5:30
प्रत्यक्ष पीक लागवड करताना उपविभागीय कृषी अधिकारी खर्डे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. धान रोवणी केल्यानंतर कीड व्यवस्थापन, रासायनिक खताची योग्यवेळी मात्रा देणे, रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास फवारणी करणे, यासाठी रोवणीच्या बांधित काही विशिष्ट अंतरावर मोकळी जागा ठेवल्यास शेतीसाठी फायदेशीर ठरतो. पाण्याचे व्यवस्थापनही करता येते, असे खर्डे यांनी सांगितले.

पट्टा पद्धतीकडे शेतकऱ्यांचा कल
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : धान पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो. वेळीच उपाययोजना न झाल्यास पीक नष्ट होते. याला अनेक बाबी कारणीभूत असतात. सुधारीत व तांत्रिक पद्धतीने शेती केल्यास कमी खर्च होऊन भरघोस उत्पादन मिळते. ही बाब हेरून वैरागड परिसरातील अनेक शेतकºयांनी आपल्या शेतात पट्टा पद्धतीने धानाची लागवड केली आहे. पीक लागवडीची पाहणी उपविभागीय कृषी अधिकारी तानाजी खर्डे यांनी बुधवारी केली.
आरमोरी तालुका कृषी कार्यालयांतर्गत वैरागड, सिर्सी, वडधा, गणेशपूर, मानापूर, भाकरोंडी, कासवी आदी गावातील अनेक शेतकऱ्यांनी पट्टा पद्धतीने धानाची लागवड केली आहे. प्रत्यक्ष पीक लागवड करताना उपविभागीय कृषी अधिकारी खर्डे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. धान रोवणी केल्यानंतर कीड व्यवस्थापन, रासायनिक खताची योग्यवेळी मात्रा देणे, रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास फवारणी करणे, यासाठी रोवणीच्या बांधित काही विशिष्ट अंतरावर मोकळी जागा ठेवल्यास शेतीसाठी फायदेशीर ठरतो. पाण्याचे व्यवस्थापनही करता येते, असे खर्डे यांनी सांगितले. यावेळी तालुका कृषी अधिकारी टी. डी. ढगे, एस. पी. ढोणे, जी. एन. जाधवर हजर होते.
हे आहेत फायदे
पट्टा पद्धतीत १० ते १५ फुटावर एक ते दीड फुटाची लांब रेषेत जागा सोडली जात असल्याने रोपांना अधिक प्रमाणात फुटवे येतात. तुडतुडे व अन्य रोगावर नियंत्रण आणता येते. मोकळ्या जागेमध्ये हवा खेळती राहते. तसेच पिकाची पाहणी करणे, रोगांचे निरीक्षण करणे यासाठी सोयीचे होते. भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश पिकांना मिळतो.