शेतकऱ्यांनी केले रास्ता रोको
By Admin | Updated: March 19, 2015 01:26 IST2015-03-19T01:26:53+5:302015-03-19T01:26:53+5:30
निवडणुकीत सर्वसामान्य जनतेला व शेतकऱ्यांना आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या सत्ताधाऱ्यांनी आश्वासनाची पूर्तता करून शेतकऱ्यांना अच्छे दिन दाखवावे,...

शेतकऱ्यांनी केले रास्ता रोको
कुरखेडा : निवडणुकीत सर्वसामान्य जनतेला व शेतकऱ्यांना आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या सत्ताधाऱ्यांनी आश्वासनाची पूर्तता करून शेतकऱ्यांना अच्छे दिन दाखवावे, या मागणीसाठी शिवसेना नेते सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्त्वात बुधवारी दुपारी १२ वाजता कुरखेडा-वडसा मार्गावर एक तास चक्काजाम आंदोलन करून वाहतूक रोखून धरण्यात आली. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी धानाला ३५०० रूपये क्विंटल भाव देण्यात यावा, तसेच एपीएल कार्डधारकांना अन्नधान्याचा नियमित पुरवठा करावा, ग्रामीण भागातील भार नियमन बंद करण्यात यावे, वर्ग ३ आणि ४ च्या नोकर भरतीत जिल्ह्यातील सर्व समाजाला समान संधी उपलब्ध करून देण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश आहे. एक तास चाललेल्या या आंदोलनानंतर शिवसेना नेते सुरेंद्र चंदेल व शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ठाण्यात आणून सोडून दिले. यावेळी आंदोलनाला डॉ. महेंद्र मोहबंशी, जि. प. सदस्य अशोक इंदूरकर, निरांजनी चंदेल, बबन बुद्धे, नरेंद्र तिरणकर, विजय पुस्तोडे, मनोहर लांजेवार, दशरथ लाडे, पुरूषोत्तम तिरगम, लोमेश कोटांगले, गुणवंत कवाडकर, देवराव टोंगे, धमेंद्र परिहार, जयराम नैताम, मुनिश्वर लांजेवार, देवेंद्र मेश्राम, प्रकाश दरवडे, आनंदराव जुमनाके, अनिल उईके, प्रभू शिवलवार, यशवंत झोडे, अज्जू सय्यद, रोशन सय्यद, उपसरपंच लता सहारे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)