शेतकऱ्यांकडे ६० हजार क्विंटल कापूस अजूनही पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 05:00 IST2020-05-01T05:00:00+5:302020-05-01T05:00:59+5:30

शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन येथे कापूस खरेदी दररोज सुरू ठेवावी, तसेच २० गाड्यांपेक्षा अधिक कापूस दररोज खरेदी करावा, अशी मागणी चामोर्शी पं.स.चे माजी उपसभापती अशोक तिवारी यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी केली आहे. कापूस हे नगदी पीक असल्याने व भाव देखील धानाच्या तुलनेत खूप जास्त मिळत असल्याने चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात कापूस पिकाची लागवड केली आहे.

 Farmers still have 60,000 quintals of cotton | शेतकऱ्यांकडे ६० हजार क्विंटल कापूस अजूनही पडून

शेतकऱ्यांकडे ६० हजार क्विंटल कापूस अजूनही पडून

ठळक मुद्देखरेदी प्रक्रियेत मंदगती : विक्रीसाठी १२०० जणांची नोंदणी

रत्नाकर बोमिडवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : कोरोनाच्या संचारबंदीमुळे कापूस खरेदी बंद पडली. दरम्यान शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन कापूस खरेदी पूर्ववत सुरू करण्यात आली. चामोर्शी तालुक्याच्या अनखोडा येथील एकमेव कापूस जिनिंग फॅक्ट्रीमध्ये कापूस खरेदी-विक्रीची सुविधा निर्माण झाली. मात्र आतापर्यंत आठवड्यात दोनच दिवस आणि २० गाड्या इतकाच कापूस खरेदी केला जात असल्याने तालुक्यासह परिसरातील कापूस उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. परिणामी शेतकऱ्यांच्या घरी ६० हजार क्विंटल कापूस विक्रीअभावी पडून आहे.
शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन येथे कापूस खरेदी दररोज सुरू ठेवावी, तसेच २० गाड्यांपेक्षा अधिक कापूस दररोज खरेदी करावा, अशी मागणी चामोर्शी पं.स.चे माजी उपसभापती अशोक तिवारी यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी केली आहे. कापूस हे नगदी पीक असल्याने व भाव देखील धानाच्या तुलनेत खूप जास्त मिळत असल्याने चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात कापूस पिकाची लागवड केली आहे. भविष्यात तालुक्यामध्ये कापसाचा पेरा वाढणारच आहे. आजपर्यंत चामोर्शी तालुक्यात एकही कापूस संकलन केंद्र नव्हते. त्यामुळे शेतकरी आपला कापूस इतर जिल्हे तसेच परराज्यात नेऊन विकत असत. परंतु यावर्षी चामोर्शी तालुक्यात अनखोडा येथे आस्था कापूस जिनिंग फॅक्ट्री सुरू झाल्याने कापूस खरेदी-विक्रीची सुविधा निर्माण झाली. परिणामी शेतकºयांनी समाधान व्यक्त केले.
कापसाची विक्री करण्यासाठी १ हजार २०० शेतकºयांनी नोंदणी केली आहे. याशिवाय घरी कापूस आहे, मात्र नोंदणी न केलेले शेतकरी अनेक आहेत. अनखोडा येथे सुरू असलेल्या कापूस खरेदी प्रक्रियेला गती नाही. त्यामुळे येथील खरेदी-विक्री प्रक्रियेची मर्यादा उठवून येथे दररोज कापूस खरेदी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

लॉकडाऊननंतर भाव घसरला
कोरोना संचारबंदीच्या पूर्वी कापूस फेडरेशनच्या वतीने कापसाला प्रतीक्विं टल ५ हजार ४५० रुपये भाव दिला जात होता. त्यानंतर लॉकडाऊनच्या काळात कापूस खरेदी बंद पडली. मात्र अत्यावश्यक सेवा व कृषी क्षेत्रात सवलती देत शासनाने धान व कापूस खरेदीची प्रक्रिया पूर्ववत सुरू करण्यास परवानगी दिली. फेडरेशनच्या वतीने सुरू असलेल्या सदर खरेदी प्रक्रियेत पूर्वीपेक्षा कापसाचा भाव कमी करण्यात आला आहे. सद्य:स्थितीत ५ हजार १०० रुपये भाव कापसाला क्विंटलमागे दिला जात आहे. प्रती क्विंटल ३५० रुपये इतका भाव कमी करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत.

Web Title:  Farmers still have 60,000 quintals of cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस