शेतकऱ्यांनी हिरवळी खताचा वापर करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:26 IST2021-06-05T04:26:27+5:302021-06-05T04:26:27+5:30
खरीप हंगामपूर्व तयारीच्या अनुषंगाने चामोर्शी तालुक्यात १ ते ७ जूनदरम्यान कृषि संजीवनी सप्ताह साजरा केला जात आहे. तालुक्यातील सर्व ...

शेतकऱ्यांनी हिरवळी खताचा वापर करावा
खरीप हंगामपूर्व तयारीच्या अनुषंगाने चामोर्शी तालुक्यात १ ते ७ जूनदरम्यान कृषि संजीवनी सप्ताह साजरा केला जात आहे. तालुक्यातील सर्व गावांमध्ये जाऊन कृषि विभागामार्फत प्रचार-प्रसिद्धी जनजागृती सुरू आहे. याअंतर्गत मोहुर्ली मोकासा येथे खरीप हंगामपूर्व शेतकरी सभा घेण्यात आली. यात भात पिकाच्या सुधारित लागवड पद्धतीमध्ये श्री पद्धत, चारसूत्री पद्धती, सगुणा, पट्टा पद्धतीने भात लागवड, पेर भात लागवड याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सभेला तालुका कृषि अधिकारी सागर डांगे, मंडळ कृषी अधिकारी वसंत वळवी, कृषी सहाय्यक सचिन रणमले, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक पुरुषाेत्तम उंदीरवाडे व गावातील शेतकरी उपस्थित होते.
बाॅक्स
प्रात्यक्षिकासह दिली माहिती
कार्यक्रमादरम्यान सूक्ष्म अन्नद्रव्ये, झिंक सल्फेटचा वापर, ३ टक्के मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया, बियाणे उगवण क्षमता चाचणी, थायरम,अझॅटोबॅक्टर, पीएसबी बीज प्रक्रिया, १० टक्के रासायनिक खत बचत मोहीम, धान शेतीमध्ये युरिया ब्रिकेट खताचा वापर, अझोला पान वनस्पतीचा वापर, हिरवळीच्या खतांच्या वापराबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच याप्रसंगी धान बीजप्रक्रिया करणे व अझोला उत्पादनाबाबत प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.
===Photopath===
040621\img-20210604-wa0103.jpg
===Caption===
शेतकऱ्यांनी हिरवळी खताचा वापर करावा फोटो