शेती शाळेतील माहितीचा उपयाेग शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:24 IST2021-06-28T04:24:49+5:302021-06-28T04:24:49+5:30
कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी कदम, कृषी उपसंचालक अरुण वसवाडे, तालुका कृषी अधिकारी ...

शेती शाळेतील माहितीचा उपयाेग शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष करावा
कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी कदम, कृषी उपसंचालक अरुण वसवाडे, तालुका कृषी अधिकारी प्रदीप वाहने, कृषी विज्ञान केंद्रातील विषयतज्ज्ञ नरेश बुद्धेवार, सरपंच युवराज भांडेकर, पाेलीस पाटील मडावी, कृषी सखी हेमलता साेनटक्के, मंडळ कृषी अधिकारी चेतन चलकलवार, कृषी पर्यवेक्षक महेंद्र दिहारे, कृषी सहायक कीर्ती सातार व महिला शेतकऱ्याची उपस्थिती हाेती. शेती शाळेत खा. अशाेक नेते यांनी येवली हे आदर्श दत्तक गाव असल्याने येथे घरकुल, शाैचालय, पिण्याच्या पाण्यासाठी आरओ आदी सुविधा उपलब्ध केल्याचे सांगितले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बऱ्हाटे यांनी युरियाच्या बचतीसाठी हिरवळीच्या खतांचा वापर करण्याचे आवाहन केले. बालाजी कदम यांनी ॲझाेला वनस्पतीच्या लागवडीबाबत सांगितले. अरुण वसवाडे यांनी बेड पद्धतीवरील धान पऱ्हे लागवडीबाबत माहिती दिली. नरेश बद्धेवार यांनी धानाची लागवड पेरीव पद्धतीने केल्यास बियाणे, खते व पैशांची बचत हाेणार, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी प्रदीप वाहने यांनी केले.