शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागातील शेतकऱ्यांना मिळताहे डिजिटल सातबारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:49 IST

लाहेरी : नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागात कव्हरेज व इंटरनेटचा अभाव आहे. शेतकऱ्यांना तालुका मुख्यालयी जाऊन सातबारा, नमुना-८ व अन्य ...

लाहेरी : नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागात कव्हरेज व इंटरनेटचा अभाव आहे. शेतकऱ्यांना तालुका मुख्यालयी जाऊन सातबारा, नमुना-८ व अन्य कागदपत्रे काढावी लागतात. यात त्यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागताे. शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन लाहेरी उपपाेलीस ठाण्याच्या वतीने डिजिलेख अभियानांतर्गत सातबारा व नमुना- ८ आदी दस्तावेज उपलब्ध करून दिले जात आहेत.

ढोबळमानाने सातबारा असा उल्लेख केला जात असला तरी महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख व नोंदवह्या तयार करणे व सुस्थितीत ठेवणे नियम १९७१चे नियम ३, ५, ६, ७ अन्वये सामान्यपणे जमिनीचा भोगवटदार व त्याचे क्षेत्र यासंबंधातील इतर नोंदींची माहिती म्हणजेच अधिकार अभिलेख हा नमुना नंबर सातमधील नमुन्यात ठेवतात. नियम २९ नुसार त्या क्षेत्रावर असलेल्या पिकांची नोंद नमुना नंबर १२ मध्ये ठेवली जाते. यांचेच एकत्रित रूप म्हणजे सातबारा. तर एका महसुली गावांमध्ये एका शेतकऱ्याच्या नावे असलेली जमीन गट नंबर किंवा सर्व्हे नंबरनिहाय संकलित केलेला नमुना म्हणजेच ८-अ होय. इंटरनेटचा वापर करून ऑनलाइन सातबारा व नमुना-८ अ काढता येताे. परंतु भामरागड तालुक्यातील लाहेरीसारख्या अतिदुर्गम निरक्षरबहुल व संगणक निरक्षर असलेल्या दुर्गम भागात ही योजनासुद्धा कुचकामी ठरते. मात्र लाहेरी पाेलिसांनी यावर उपाय शाेधला आहे. पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली लाहेरी उपपाेलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अविनाश नळेगावकर यांनी डिजिलेख अभियान सुरू केले आहे.

बाॅक्स

नक्षलपीडित कुटुंबांना नि:शुल्क उतारे

लाहेरी उपपाेलीस स्टेशन येथे केवळ शासकीय शुल्क अदा करून डिजिटल स्वाक्षरीत हे उतारे शेतकऱ्यांना मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, नक्षलपीडित कुटुंबातील सदस्यांना हे उतारे नि:शुल्क मिळतील कारण या उताऱ्यांचे शुल्क लाहेरी पोलीस स्वतःचे खर्चातून अदा करणार आहेत. लाहेरी पोलिसांच्या या शेतकरीभिमुख पुढाकाराने परिसरातील शेतकरी बांधवांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. अशा प्रकारची सुविधा इतरही दुर्गम व साधन सामग्रीचा अभाव असलेल्या भागांमध्ये राबविली जावी, अशी आशा व्यक्त केली जात आहे.