देसाईगंजमध्ये शेतकऱ्यांचा चक्काजाम
By Admin | Updated: June 8, 2017 01:37 IST2017-06-08T01:37:06+5:302017-06-08T01:37:06+5:30
शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, उत्पादन खर्चाइतका शेतमालाला भाव देण्यात यावा

देसाईगंजमध्ये शेतकऱ्यांचा चक्काजाम
शिवसेनेचे नेतृत्व : संपूर्ण कर्जमुक्तीसाठी सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, उत्पादन खर्चाइतका शेतमालाला भाव देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या नेतृत्वात देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुरूवारी नागपूर-वडसा टी पॉर्इंटवर चक्काजाम आंदोलन केले. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळ प्रभावित झाली होती.
शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आनंद जाधव यांच्या मार्गदर्शनात शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी हे चक्काजाम आंदोलन केले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख सचिन वानखेडे, उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम, तालुका प्रमुख नंदू चावला, श्रीकांत बन्सोड, प्रशांत किलनाके, विठ्ठल ढोरे, दिगांबर मेश्राम, दिनेश मोहुर्ले, विकास प्रधान, प्रविण राऊत, ब्रह्मदास आकरे, साबू पठाण, दीपक मेश्राम, जगदिश सहारे, नितीन लिंगायत, खुशाल दोनाडकर, मंगेश चौधरी, मुन्ना नागलवाडे, कार्तिक सालोटे, प्रविण राऊत, सेवादास पुणे, क्रिष्णा कारणकर, वैभव पाटील, चंद्रशेखर मांदाळे, अश्विन डोंगरवार, प्रमोद निमकर यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा, अशी नारेबाजी शिवसैनिकांनी यावेळी केली.