शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

शेतकऱ्यांचा जीव भांड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 23:13 IST

मंगळवारच्या मध्यरात्रीपासून बुधवारी सायंकाळपर्यंत गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात संततधार पावसाने हजेरी लावली. यामुळे मरणासन्न झालेल्या पऱ्ह्यांना जीवदान मिळाले आहे. यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देरात्रीपासून सरीवर सरी : करपण्याच्या स्थितीतील पºह्यांना जीवदान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मंगळवारच्या मध्यरात्रीपासून बुधवारी सायंकाळपर्यंत गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात संततधार पावसाने हजेरी लावली. यामुळे मरणासन्न झालेल्या पऱ्ह्यांना जीवदान मिळाले आहे. यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे. बुधवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार बाराही तालुक्यात २४ तासात सरासरी १३.४ मिमी एवढा पाऊस झाल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन विभागाने घेतली आहे.गडचिरोली तालुक्यासह चामोर्शी, अहेरी उपविभाग तसेच आरमोरी, वडसा, धानोरा ते कोरचीपर्यंत पाऊस बरसला. बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस सुरू होता.वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी महिला भर पावसात घराबाहेर पडल्या. पावसातच त्यांनी विनातक्रार वडाच्या झाडाची पुजा केली.अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरद्वारे आपल्या शेतजमिनीत नांगरणी करून रोवणीयोग्य केली आहे. शेताच्या बांधावर पाळे टाकून तूर व तीळ पिकाची लागवड करण्यात आली. या पावसामुळे तूर व तिळाचे अंकूरही बाहेर निघाले आहेत. एकूणच सदर संततधार पावसाने शेतकऱ्यांसह जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे. वातावरणातील उकाडाही बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे.धानपिकाचे पऱ्हे टाकल्याला आठ दिवसांचा कालावधी उलटला. मात्र पावसाचा पत्ता नव्हता. २७ जून रोजी सकाळपासून दुपारपर्यंत आरमोरी तालुक्याच्या वैरागड परिसरात जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंददायी वातावरण आहे. आर्द्रा नक्षत्र संपण्याच्या मार्गावर असताना पावसाचा पत्ता नव्हता. या भागातील अनेक ठिकाणचे पऱ्हे करपायला लागले होते. पऱ्हे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी धावपळ सुरू केली होती. दरम्यान बुधवारी झालेल्या संततधार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आता रोवणीच्या कामास सुरुवात होणार आहे. पावसामुळे जिल्ह्याच्या अनेक गावात अंतर्गत रस्त्यावर तसेच सखल भागात पाणी साचले आहे. शहरातील नाल्या पाण्याने वाहत आहेत. संततधार पावसामुळे नागरिकांना छत्र्यांचा आधार घ्यावा लागत आहे.रोवणीस होणार सुरूवातसंततधार पावसाने शेतशिवारात पाणी साचले असून नदी, नाल्यांची पाणीपातळी वाढली आहे. या पावसामुळे करपण्याच्या मार्गावर असलेल्या धान पऱ्ह्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. आतापर्यंत पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी वर्ग आता खत जुळविणीपासून रोवणीच्या तयारीच्या कामाला जोमाने भिडला आहे. हा पाऊस दोन दिवस कायम राहिल्यास येत्या लवकरच जिल्ह्यात धानपीक रोवणीच्या कामास प्रारंभ होणार आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी