दीड वर्षांपासून शेतकरी सौरपंपाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:32 IST2021-03-15T04:32:31+5:302021-03-15T04:32:31+5:30
धानोरा तालुक्यातील जानू गणू हीचामी रा फासिटोला (दुधमाळा) व वासुदेव गुरनुले दुधमाळा यांच्या शेतात दीड वर्षापूर्वी सौर प्लेट लावून ...

दीड वर्षांपासून शेतकरी सौरपंपाच्या प्रतीक्षेत
धानोरा तालुक्यातील जानू गणू हीचामी रा फासिटोला (दुधमाळा) व वासुदेव गुरनुले दुधमाळा यांच्या शेतात दीड वर्षापूर्वी सौर प्लेट लावून ठेवण्यात आले आहेत. तालुक्यात अशी आणखी प्रकरणे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याची सोय आहे त्यांना सरकारने इलेक्ट्रिक बिलाचा खर्च लागू नये याकरिता मुख्यमंत्री सौर कृषी योजना अंतर्गत विहिरीवर सोलर पंप बसवून देण्याची योजना सुरू केली आहे. सदर काम खासगी कंपन्यांना देण्यात आले आहे. कंपनी निवडण्याचा अधिकार शेतकऱ्यांना देण्यात आला. या शेतकऱ्यांनी मुद्रा कंपनीची निवड करून सोलर पंप बसविण्याकरिता ८ हजार २८० रुपये डिमांड भरले. त्यानंतर कंपनीने ऑगस्ट २०१९ मध्ये काही सामान आणून १५ सप्टेंबर २०१९ ला या शेतकऱ्यांच्या शेतात सोलर प्लेट उभे करण्यात आले. त्याकरिता लागणारा सिमेंटचा खर्चही शेतकऱ्यांनीच केला. परंतु तेव्हापासून दीड वर्षाचा कालावधी उलटूनही फक्त सौर फ्लॅटच उभे आहेत. बॅटऱ्या व इतर साहित्य लावण्यात आले नाही. त्यामुळे पंप सुरू झाले नाही. शेतकऱ्यांनी डिसेंबर २०२० ला धानोरा येथील वीज वितरण कंपनीचे कार्यालयात तक्रार दाखल केली. परंतु अजूनपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. शेतकऱ्यांनी कंपनीने दिलेल्या मोबाइलवर फोन लावले असता आठ दिवसात बॅटरी लावून देतो असे सांगितले जाते परंतु ते लावून दिले नाही. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊ नये तक्रारींचे निरसन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.