शेतकरीच हाताळतात विद्युत डीपी बाॅक्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:37 IST2021-04-07T04:37:47+5:302021-04-07T04:37:47+5:30
गाव तिथे लाईनमन असे शासनाचेच धोरण आहे. विविध प्रकारचे पीक घेऊन उत्पादन घेण्याकडे शेतकरी वळले आहेत. त्या अनुषंगाने अलीकडे ...

शेतकरीच हाताळतात विद्युत डीपी बाॅक्स
गाव तिथे लाईनमन असे शासनाचेच धोरण आहे. विविध प्रकारचे पीक घेऊन उत्पादन घेण्याकडे शेतकरी वळले आहेत. त्या अनुषंगाने अलीकडे कृषी क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. शासकीय स्तरावरून सिंचन विहिरी, विंधन विहिरी बेरोजगारीवर मात करण्यासाठी पर्याय ठरू लागल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी कृषिपंपांचा वापर करणे सुरू केले आहे. मात्र एकाच लाईनमनकडे पाच-पाच गावांचा प्रभार असल्याने लावण्यात आलेल्या ट्रान्सफाॅर्मरच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. जराही ओव्हरलोड झाल्यास वारंवार फ्यूज उडणे ही समस्या नेहमीच उद्भवते. सिंचन सुविधा प्रभावित झाल्याने आवश्यक त्या प्रमाणात शेतीला पाणी पुरवणे शक्य होत नाही. डीपी बाॅक्समधील फ्यूज लाॅकसिस्टिमचे असले तरी गरजेच्या वेळी डीपी बाॅक्स जबरदस्तीने उघडल्या जात असल्याने लाॅक तुटलेले दरवाजे उघडे राहतात. शेतकऱ्यांना याेग्य मार्गदर्शन मिळत नाही व वेळीच वीज दुरुस्ती केली जात नाही. महावितरणच्या भोंगळ व मनमानी कारभारावर प्रश्नचिन्ह आहे. गाव तिथे लाईनमन नियुक्त करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
बाॅक्स ......
अनेकदा शेतकरीच टाकतात फ्यूज
लाईनमन वेळेवर उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना जीवावर उदार होऊन वेळीच फ्यूज टाकून सिंचन सुविधा नियमित करावी लागते. डीपी बाॅक्समधील फ्यूज लाॅकसिस्टिमचे असले तरी गरजेच्या वेळी डीपी बाॅक्स जबरदस्तीने उघडल्या जात असल्याने लाॅक तुटलेले दरवाजे उघडे राहतात. यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. तरीदेखील वेळेवर लाईनमन उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांनाच उडलेले फ्यूज टाकावे लागते. लाईनमन वेळेवर उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना जीवावर उदार होऊन वेळीच फ्यूज टाकून सिंचन सुविधा नियमित करावी लागते. यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. तरीदेखील वेळेवर लाईनमन उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांनाच उडालेले फ्यूज टाकावे लागते.