शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या लपंडावाने शेतकरी हैराण

By admin | Updated: October 9, 2014 23:01 IST

गेल्या महिनाभरापासून पावसाने उसंत घेतल्यामुळे कमी मुदतीचे हलक्या प्रतीचे धानपिक धोक्यात आले आहे. वैरागड परिसरातील शेतकरी मिळेल त्या साधनाने कृत्रिमरित्या धानपिकाला

वैरागड : गेल्या महिनाभरापासून पावसाने उसंत घेतल्यामुळे कमी मुदतीचे हलक्या प्रतीचे धानपिक धोक्यात आले आहे. वैरागड परिसरातील शेतकरी मिळेल त्या साधनाने कृत्रिमरित्या धानपिकाला पाणीपुरवठा करण्यासाठी धडपड करीत आहेत. मात्र वैरागड परिसरात विद्युत विभागाच्या भोंगळ कारभारामुळे विजेच्या लपंडावाच्या समस्येमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. वैरागड परिसरातील ज्या शेतकऱ्यांकडे विद्युत पंपाद्वारे सिंचन करण्याची व्यवस्था आहे, असे शेतकरी शेतालगत असलेल्या पाण्याच्या स्त्रोतावर विद्युत मोटारपंप लावून हलक्या तसेच जडप्रतीच्या धानपिकाला पाणीपुरवठा करीत आहेत. मात्र या भागामध्ये वारंवार विद्युतपुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे हाती आलेले धानपिक गमविण्याची वेळ या भागातील शेतकऱ्यांवर आली आहे. रोज दिवसा दुपारी ३ वाजतापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत वैरागड परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत होत आहे. रात्रीच्या सुमारास विजेचा पुरेसा दाबही नसतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे विद्युत पंप निकामी ठरत आहेत. या संदर्भात अनेक शेतकऱ्यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केले असता, विद्युत पुरवठ्यांमध्ये वरूनच बिघाड आहे. असे उत्तर मिळत आहे. वैरागड येथे विद्युत विभागाचे कार्यालय आहे. मात्र या समस्येकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. वैरागड येथे एक नवीन जनित्र उभारण्यात आले. मात्र या जनित्राची विद्युततारांशी जोडणी करण्यात आली नाही. (वार्ताहर)