शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंब नियोजनात पुरूष माघारले

By admin | Updated: June 12, 2015 02:29 IST

कुटुंब नियोजनाचे वार्षिक उद्दीष्ट गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्राप्त झाले आहे. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेच्या

महिला आघाडीवर : पाच वर्षांत १५ हजार ३२२ पुरूष तर १५ हजार ४५७ महिलांची नसबंदी
दिलीप दहेलकर ल्ल गडचिरोली
कुटुंब नियोजनाचे वार्षिक उद्दीष्ट गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्राप्त झाले आहे. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेच्या आकडीवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. मात्र या शस्त्रक्रियेत महिलांचा पुढाकार अधिक असून शस्त्रक्रियेत पुरूष माघारले असल्याचे दिसून येत आहे. २०१०-११ ते २०१४-१५ या पाच वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात १५ हजार ३२२ पुरूष व १५ हजार ४५७ महिलांनी नसबंदी केली असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे.
२०१०-११ या वर्षात जिल्ह्याला एकूण ६ हजार ५०० कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेचे उद्दीष्ट होते. यापैकी ३ हजार १ पुरूष व २ हजार ८१७ महिला अशा एकूण ५ हजार ८१८ जणांवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली. याची टक्केवारी ८९.५१ आहे.
२०११-१२ या वर्षात सहा हजार शस्त्रक्रियेचे उद्दीष्ट जिल्ह्याला होते. यापैकी २ हजार ८१७ पुरूष व २ हजार ९६८ स्त्रिया अशा एकूण ५ हजार ७८५ जणांवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली. याची टक्केवारी ९६.४२ आहे. २०१२-१३ या वर्षात जिल्ह्याला एकूण ६ हजार ३६६ कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेचे उद्दीष्ट होते. यापैकी ३ हजार ३३३ पुरूष व ३ हजार ३४ स्त्रीया अशा एकूण ६ हजार ३६७ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. याची टक्केवारी १०० आहे.
२०१३-१४ या वर्षात जिल्ह्याला ६ हजार ५०० शस्त्रक्रियेचे उद्दीष्ट होते. यात ३ हजार ३३१ पुरूष व २ हजार ९८९ महिला अशा एकूण ६ हजार ३३४ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. याची टक्केवारी ९५.९६ आहे.२०१४-१५ या वर्षात ६ हजार ६५९ शस्त्रक्रियेचे उद्दीष्ट होते. यात २ हजार ८४० पुरूष व ३ हजार ६४९ महिला अशा एकूण ६ हजार ४८९ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. याची टक्केवारी ९७.४४ आहे.

दोन वर्षांत मोठा फरक
४२०१३-१४ व २०१४-१५ या दोन वर्षातील कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेची आकडेवारी बघितली असता, पुरूष व महिलांच्या शस्त्रक्रियेत मोठा फरक दिसून येतो. या दोन वर्षात ५ हजार ७९२ पुरूषांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली तर ७ हजार ३१ महिलांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली. १ हजार २३९ शस्त्रक्रिया महिलांच्या अधिक आहे. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेत पुरूषांचा पुढाकार वाढण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने प्रभावी जनजागृती होणे गरजेचे आहे.

पुरूषातील नसबंदीबाबतचे अज्ञान कारणीभूत
४जिल्हा आरोग्य विभागाने पुरूष नसबंदीसाठी जनजागृती केली. मात्र पुरूष नसबंदीच्या आकडेवारीत फरक पडला नाही. यासाठी पुरूषामध्ये पुरूष नसबंदीविषयीचे अज्ञान कारणीभूत आहे. पुरूष कमावत असल्याने शस्त्रक्रियेमुळे अशक्तपणा येईल, या भितीने परिवारातील वरिष्ठ व्यक्ती पुरूष नसबंदीसाठी विरोध करीत असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. काही कुटुंबात गैरसमजुतीमुळे सुध्दा महिलांना कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी पुढे केले जात असल्याचे दिसून येत आहे.