शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंब नियोजनात आरमोरी आघाडीवर

By admin | Updated: June 13, 2015 01:54 IST

कुटुंब नियोजन कार्यक्रमाची व्याप्ती वाढवून लोकसंख्या मर्यादित ठेवण्यासाठी केंद्र व राज्य शासन दरवर्षी कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत आहे.

दोन वर्षांच्या आकडेवारीवरून स्पष्ट : एटापल्ली तालुका कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेत माघारला
दिलीप दहेलकर गडचिरोली
कुटुंब नियोजन कार्यक्रमाची व्याप्ती वाढवून लोकसंख्या मर्यादित ठेवण्यासाठी केंद्र व राज्य शासन दरवर्षी कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत आहे. मात्र साक्षरता कमी असलेल्या दुर्गम व आदिवासी भागात कुटुंब नियोजनाच्या कार्यकमाला अल्प प्रतिसाद मिळत आहे. दोन वर्षांच्या आकडेवरीलवरून कुटुंब नियोजन कार्यक्रमात आरमोरी तालुका आघाडीवर आहे. तर दुर्गम आदिवासीबहुल एटापल्ली तालुका माघारला असल्याचे दिसून येते.
२०१३-१४ व २०१४-१५ या दोन वर्षात झालेल्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून आरमोरी तालुका शस्त्रक्रियेत आघाडीवर तर एटापल्ली तालुका पिछाडीवर असल्याचे स्पष्ट होते. २०१३-१४ या वर्षात गडचिरोली तालुक्याला एकूण ९४४ शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट होते. यात ३१४ पुरूष व ४५२ स्त्रिया असा एकूण ७६६ जणांवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली. याची टक्केवारी ८१.४४ आहे. वडसा तालुक्याला ५२७ शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट होते. यात पुरूष १३० व महिला ३१६ असे एकूण ४४६ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. याची टक्केवारी ८४.६२ आहे. आरमोरी तालुक्याला ६०२ शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट होते. यात ३१९ पुरूष व ३३१ स्त्रिया अशा एकूण ६५० जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. याची टक्केवारी १०७.९७ आहे. कोरची तालुक्याला २७४ शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट होते. यात पुरूष १०६ व स्त्रिया १२० अशा एकूण २२६ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. याची टक्केवारी ८२.४८ आहे. कुरखेडा तालुक्याला ५५५ शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट होते. यात २५६ पुरूष व २८१ स्त्रिया अशा एकूण ५३७ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. याची टक्केवारी ९६.७५ आहे. चामोर्शी तालुक्याला एक हजार ४० शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट होते. यात पुरूष २७० व स्त्रिया ८८१ अशा एकूण एक हजार १५१ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून याची टक्केवारी ११० आहे. मुलचेरा तालुक्याला ३३७ शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट होते. यात पुरूष ६२ व स्त्रिया २९२ अशा एकूण ३५४ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून याची टक्केवारी १०५ आहे. अहेरी तालुक्याला ६६३ शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट होते. यात पुरूष ३८२ व स्त्रिया २९१ अशा एकूण ६७३ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. याची टक्केवारी १०१.५० आहे. सिरोंचा तालुक्याला ४६२ शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट होते. यात पुरूष २१० व स्त्रिया २६७ अशा एकूण ४७७ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून याची टक्केवारी १०३.२४ आहे.
धानोरा तालुक्याला २०१३-१४ या वर्षात ४८८ शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट होते. यात पुरूष ३१७ व स्त्रिया १३० अशा एकूण ४४७ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून याची टक्केवारी ९१.५९ आहे. भामरागड तालुक्याला २१९ शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट होते. यात केवळ १९५ पुरूषांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून याची टक्केवारी ८९ आहे. पुरूषांच्या तुलनेत महिलाच कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत आघाडीवर असल्याचे दिसून येते.