व्यावसायिक आकसापोटी विनयभंगाची खोटी तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:06 IST2021-03-13T05:06:26+5:302021-03-13T05:06:26+5:30

तक्रारदार मुलीच्या वडिलांसोबत माझे वडील पुंडलिक निपाने यांचा रेतीघाटाच्या भागीदारीतून वाद होता. याच वादातून रेती घाटातील इतर काही भागीदारानी ...

False report of professional misconduct | व्यावसायिक आकसापोटी विनयभंगाची खोटी तक्रार

व्यावसायिक आकसापोटी विनयभंगाची खोटी तक्रार

तक्रारदार मुलीच्या वडिलांसोबत माझे वडील पुंडलिक निपाने यांचा रेतीघाटाच्या भागीदारीतून वाद होता. याच वादातून रेती घाटातील इतर काही भागीदारानी कटकारस्थान करीत पोलीस स्टेशन कुरखेडा येथे ९ मार्च रोजी विनयभंगाचा खोटी तक्रार दाखल केली. माझ्या वडीलाना मानसिक त्रास देत सामाजिक प्रतिष्ठा खराब करण्याकरीता करण्यात आलेला खटाटोप आहे.विनयभंग करण्यात आलेला कथीत घटणास्थळ हा मूख्य रसत्यावर व वर्दळीचे ठिकाणी असताना कथित पीडिताकडून कठलीच आरडा ओरड न होणे हा सर्व प्रकार संशयास्पद आहे. पोलीस विभागाने सदर घटनेची योग्य ती चौकशी करीत बनावट तक्रार करणाऱ्याविरोधातच गून्हा दाखल करावा अशी मागणी सूद्धा यावेळी पत्रकार परिषदेत चेतन निपाने याने केली आहे. सदर संपूर्ण प्रकरणात पोलींसाना सर्वोतोपरी सहकार्य करण्यास आम्ही तयार असल्याचेसुद्धा त्याने यावेळी सांगितले.

Web Title: False report of professional misconduct