वाळवीने केले दस्तावेज फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 22:28 IST2018-11-05T22:27:57+5:302018-11-05T22:28:28+5:30
आलापल्ली येथील वनसंपदा या इमारतीमधील भामरागड वनविभागाच्या कार्यालयातील स्टोअर रूममध्ये जुन्या दस्तावेजांना वाळवी लागली असून संपूर्ण दस्तावेज नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मात्र याकडे वनविभागाचे दुर्लक्ष झाले आहे.

वाळवीने केले दस्तावेज फस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली : आलापल्ली येथील वनसंपदा या इमारतीमधील भामरागड वनविभागाच्या कार्यालयातील स्टोअर रूममध्ये जुन्या दस्तावेजांना वाळवी लागली असून संपूर्ण दस्तावेज नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मात्र याकडे वनविभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
न्यायालयीन खटले व इतर कामांसाठी जुने दस्तावेज अत्यंत महत्त्वाचे आहेत. या दस्तावेजांची नागरिकांकडून वेळोवेळी मागणी होते. त्यामुळे त्यांचे जतन करणे आवश्यक आहे. मात्र वनविभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. स्टोअररूममध्ये जुने दस्तावेज अस्ताव्यस्त पडून आहेत. सदर कागदपत्रे एका कापडात गुंडाळून ठेवण्यात आले आहेत. याचा अर्थ हे दस्तावेज महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट होते. मात्र यातील काही दस्तावेज उंदरांनी कुरतडले आहेत. तर काही दस्तावेजांना वाळवी लागली आहे.
जुने दस्तावेज महत्त्वाचे असले तरी वनविभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे ते दस्तावेज नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांकडून दस्तावेजांची मागणी झाल्यानंतर दस्तावेज उपलब्ध नसल्याचे सांगीतले जाते. परिणामी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून जे दस्तावेज शिल्लक आहेत. ते व्यवस्थित ठेवण्याची सोय करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.