६८ वाहनचालकांची नेत्र तपासणी
By Admin | Updated: January 19, 2017 02:00 IST2017-01-19T02:00:35+5:302017-01-19T02:00:35+5:30
डॉ. अप्पलवार आय हॉस्पिटल, राज्य परिवहन विभाग तसेच उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने

६८ वाहनचालकांची नेत्र तपासणी
आॅटोरिक्षा चालकांना मार्गदर्शन : उपप्रादेशिक परिवहन विभागाचा उपक्रम
गडचिरोली : डॉ. अप्पलवार आय हॉस्पिटल, राज्य परिवहन विभाग तसेच उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी डॉ. अप्पलवार आय हॉस्पिटलमध्ये ६८ आॅटोरिक्षा चालक, टॅक्सीचालक व बसचालकांची नेत्र तपासणी करण्यात आली.
डॉ. हेमंत अप्पलवार व डॉ. अद्वय अप्पलवार यांनी चालकांची नेत्र तपासणी केली. यावेळी सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शांताराम फासे, मोटारवाहन निरीक्षक नीलेश बन्सोडे, विलास अहेर, सहायक मोटार वाहन निरीक्षक दिनेश पाटील, गडचिरोली आगाराचे वाहतूक निरीक्षक बंडू तिलगामे, किशोर लिंगलवार, आॅटोरिक्षा युनियनचे अध्यक्ष मनोज आत्राम, टॅक्सी युनियनचे अध्यक्ष वैरागडे आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. हेमंत अप्पलवार म्हणाले, वाहनचालकांची दृष्टी योग्य असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक वाहनचालकाने नियमितपणे डोळ्यांची तपासणी करावी, आवश्यक असल्यास वाहन चालविताना चष्म्याचा वापर करावा, ज्या चालकाला चष्मा लागला आहे, अशा वाहनचालकाने चष्म्याशिवाय कधीही वाहन चालवू नये. दृष्टी जास्त दिवस टिकण्यासाठी डोळ्यांची योग्य काळजी घ्यावी, असे मार्गदर्शन केले.
सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शांताराम फासे यांनी मार्गदर्शन करताना प्रत्येक वाहकाने स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, मानसिक तणावात असताना वाहन चालवू नये, असे मार्गदर्शन केले. (नगर प्रतिनिधी)