६२ कैद्यांची नेत्र तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2017 00:40 IST2017-02-20T00:40:42+5:302017-02-20T00:40:42+5:30
समता फाऊंडेशन व जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी जिल्हा कारागृहात ...

६२ कैद्यांची नेत्र तपासणी
कारागृहात कार्यक्रम : डोळ्यांची काळजी घेण्याचा सल्ला
गडचिरोली : समता फाऊंडेशन व जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी जिल्हा कारागृहात नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरादरम्यान ६२ बंदी व कर्मचाऱ्यांचे नेत्र तपासणी करून त्यांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी नेत्र चिकित्सक व्ही. एस. गुडधे यांनी नेत्र तपासणी केली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कारागृहाचे प्रभारी अधीक्षक बी. सी. निमगडे व इतर कर्मचारी उपस्थित होते. गडचिरोली येथील खुल्या कारागृहात एकूण ६० बंदी आहेत. त्यांच्या आरोग्याची देखभाल घेण्याच्या दृष्टीने कारागृह प्रशासनाच्या वतीने शिबिर आयोजीत करून डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी नियमितपणे करून घेतली जाते. या अंतर्गतच कारागृहात नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला. ज्या कैद्यांना चष्म्याची आवश्यकता भासली. अशा कैद्यांना मोफतच चष्म्यांचेही वितरण करण्यात आले. यावेळी डॉ. गुडधे यांनी डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी डोळ्यांची निगा कशी राखावी, याबाबत मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)