शहरं
Join us  
Trending Stories
1
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
2
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
3
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
4
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
5
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
6
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
7
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
8
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
9
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
10
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
11
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
12
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
14
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
15
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
16
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
17
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
18
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
19
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
20
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला

जहाल नक्षलवादी महिलेचे आत्मसमर्पण; ठेवण्यात आले होते सहा लाखांचे बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 21:16 IST

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने प्रभावीपणे राबविण्यात आलेल्या नक्षलविरोधी अभियानामुळे सन २०१९-२०२१ या वर्षामध्ये एकूण ३९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.

गडचिरोली - हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून आणि शासनाच्या आत्मसर्पण योजनेमुळे प्रभावित होऊन सहा लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या एका जहाल नक्षलवादी महिलेने २३ जूनला गडचिरोली येथे आत्मसमर्पण केले. येथील नवजीवन वसाहतीच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी तिचे स्वागत केले. (an extremist naxalite Woman surrenders in Gadchiroli)

शशिकला ऊर्फ गुनी ऊर्फ झुरी ऊर्फ अंजू आसाराम आचला (३०) रा. मोठा झेलिया, ता. धानोरा, असे आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी महिलेचे नाव आहे. शशिकला ही डिसेंबर २००६मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाली होती. सध्या ती टिपागड एलओएसमध्ये एसीएम पदावर कार्यरत होती. तिच्यावर नक्षल चकमकीचे १५, जाळपोळीचा एक आणि इतर चार, असे एकूण २० गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तिला पकडून देणाऱ्यास शासनाने सहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

महिला नक्षलीचे गडचिरोलीत आत्मसमर्पण; दोन लाखांचे बक्षीस केले होते जाहीर

आत्मसमर्पण योजनेमुळे अनेक नक्षलवादी चळवळीतून बाहेर पडत आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी यावेळी दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आदी उपस्थित होते.

दोन वर्षांत ३९ नक्षलींची शरणागती -गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने प्रभावीपणे राबविण्यात आलेल्या नक्षलविरोधी अभियानामुळे सन २०१९-२०२१ या वर्षामध्ये एकूण ३९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यामध्ये चार डीव्हीसी, दोन दलम कमांडर, तीन उपकमांडर, २९ सदस्य आणि एक जनमिलिशिया आदींचा समावेश आहे. आता या आत्मसमर्पण केलेल्यांना आश्रय देण्यासाठी पोलिसांनी गडचिरोली शहरालगत खास वसाहत तयार केल्यामुळे आत्मसमर्पणाचे प्रमाण वाढेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोलीPoliceपोलिसSoldierसैनिक