जंगलात विवाहित महिलेवर अतिप्रसंग
By Admin | Updated: December 20, 2015 01:22 IST2015-12-20T01:22:00+5:302015-12-20T01:22:00+5:30
कामानिमित्त गावानजीकच्या जंगलात गेलेल्या विवाहित महिलेवर एका नराधमाने अतिप्रसंग केल्याची घटना ..

जंगलात विवाहित महिलेवर अतिप्रसंग
आरोपीला अटक : कोरेली खुर्द येथील घटना
पेरमिली : कामानिमित्त गावानजीकच्या जंगलात गेलेल्या विवाहित महिलेवर एका नराधमाने अतिप्रसंग केल्याची घटना अहेरी तालुक्यातील पेरमिली उपपोलीस ठाण्यांतर्गत कोरेली खुर्द येथे शुक्रवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सुधाकर दोगे आत्राम (२८) याला अटक केली आहे.
सुधाकार आत्राम याने बळजबरीने अतिप्रसंग केल्याची माहिती संबंधित पीडित महिलेने पंचा समक्ष सांगितली. त्यानंतर ग्रामस्थांनी पीडित महिलेच्या पतीसह पेरमिली उपपोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून पेरमिली पोलिसांनी आरोपी सुधाकर आत्राम याचेवर भादंविचे कलम ३७६, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून लागलीच आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास अहेरी एसडीपीओंच्या मार्गदर्शनात पेरमिलीचे पोलीस उपनिरिक्षक दिनेश मोरे करीत आहेत. (वार्ताहर)