कर्जमाफी अर्जाला मुदतवाढ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 23:15 IST2017-09-14T23:15:41+5:302017-09-14T23:15:58+5:30
कर्जमाफी योजनेचे आॅनलाईन अर्ज विविध तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकºयांनी भरले नाहीत.

कर्जमाफी अर्जाला मुदतवाढ द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : कर्जमाफी योजनेचे आॅनलाईन अर्ज विविध तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकºयांनी भरले नाहीत. त्यामुळे सदर शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहण्याचा धोका आहे. त्यामुळे अर्ज भरण्याला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी कुरखेडा तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
शासनाने आॅनलाईन अर्ज भरण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत दिली आहे. कुरखेडा तालुक्यातील बहुतांश गावे दुर्गम आहेत. या गावातील शेतकºयांना कर्जमाफीचे अर्ज भरण्याविषयी अनेक दिवस माहितच नव्हते. काही केंद्रावर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. महिनाभर केंद्रांवर गर्दी असतानाही अनेक शेतकºयांचे अर्ज भरल्या गेले नाही. त्यातच आता १५ सप्टेंबर ही शेवटची तारीख घोषित केली आहे. यामुळे अनेक शेतकरी वंचित राहण्याचा धोका आहे. याबाबतची दखल घेऊन अर्ज भरण्याला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
निवेदन देतेवेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन नाट, काँग्रेस तालुका अध्यक्ष जयंत हरडे, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी, पं. स. उपसभापती मनोज दुनेदार, आनंदराव जांभुळकर, रोहित ढवळे, पुंडलिक निपाने, मनीराम रामटेके, विश्वनाथ कांबळे, संजय नाकतोडे, अमोल पवार, नाजूक तुलावी, आनंदी कोसरिया, नीलकंठ सयाम, रामकृष्ण सयाम यांच्यासह तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. याबाबत आपण पाठपुरावा करू, असे आश्वासन तहसीलदारांनी दिले.