सामान्य रुग्णालयातील ६० अस्थायी पदांना मुदतवाढ
By Admin | Updated: October 17, 2016 02:01 IST2016-10-17T02:01:43+5:302016-10-17T02:01:43+5:30
आरोग्यसेवा, नागपूर मंडळाअंतर्गत असलेल्या येथील २०० खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह विविध ६० पदे अस्थायी स्वरूपात भरण्यात आली आहेत.

सामान्य रुग्णालयातील ६० अस्थायी पदांना मुदतवाढ
गडचिरोली : आरोग्यसेवा, नागपूर मंडळाअंतर्गत असलेल्या येथील २०० खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह विविध ६० पदे अस्थायी स्वरूपात भरण्यात आली आहेत. या अस्थायी पदांना २८ फेब्रुवारी २०१७ पर्यंत मुतदवाढ देण्यात आली आहे.
यासंदर्भात राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने १५ आॅक्टोबर २०१६ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील सदर ६० अस्थायी पदांना १ मार्च २०१६ ते ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत यापूर्वी मुतदवाढ देण्यात आली होती. आता पुन्हा शासनाने निर्णय घेतला असून या ६० अस्थायी पदांना १ आॅक्टोबर २०१६ ते २८ फेब्रुवारी २०१७ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे सदर अस्थायी पदावर असलेले वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी आरोग्य सेवा सदर रुग्णालयात देणार आहेत.
मुदतवाढ मिळालेल्या ६० अस्थायी पदांमध्ये वैद्यकीय अधिकारी ३, परिसेविका ३, अधिपरिचारिका १२, रक्तपेढी तंत्रज्ञ १, क्षयकिरण तंत्रज्ञ वर्ग-३ चे १ पद, प्रयोगशाळा तंत्रज्ञ १, औषध निर्माता १, रुग्णवाहिका चालक १, बाह्यरुग्ण सेवक १, अपघात विभाग सेवक १, शस्त्रक्रियागृह परिचर २, कक्ष सेवक ४, सफाईगार ५, शिपाई १, धोबी १, उदवाहक चालक १, पहारेकरी १, वरिष्ठ लिपीक १, कनिष्ठ लिपीक १, वैद्यकीय अधिकारी वर्ग २ चे १ पद, सिस्टर ट्युटर १ आदी पदांचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालयातील आरोग्यसेवा पुरेशा मनुष्यबळाअभावी प्रभावित होऊ नयेत, याकरिता सदर अस्थायी पदे भरण्यात आली आहेत.
रिक्त पदांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर वाढला भार
जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. परिणामी वाढत्या रुग्णसंख्येच्या आरोग्य सेवेचा भार कार्यरत वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांवर पडत आहे.