योजना जनतेपर्यंत पोहोचवा

By Admin | Updated: June 5, 2017 00:39 IST2017-06-05T00:39:54+5:302017-06-05T00:39:54+5:30

केंद्र व राज्य शासनाने सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले आहेत.

Extend the scheme to the public | योजना जनतेपर्यंत पोहोचवा

योजना जनतेपर्यंत पोहोचवा

खासदारांचे प्रतिपादन : सिरोंचा येथे विस्तार कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : केंद्र व राज्य शासनाने सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.
सिरोंचा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय विस्तार विषयक कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी विकास पाठक, जिल्हा महामंत्री रवीेंद्र ओल्लालवार, सिनेट सदस्य प्रकाश गेडाम, प्राचार्य डी. के. मेश्राम, ताराबाई कोटांगले, तालुका अध्यक्ष दामोधर अरगेलवार उपस्थित होते. विकास पाठक यांनी मार्गदर्शन करताना मागील तीन वर्षात देशाने विकासात आघाडी घेतली आहे. प्रत्येक योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्र व राज्य शासन आग्रही असल्याचे प्रतिपादन विकास पाठक यांनी केले. यशस्वीतेसाठी जावेद अली, युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील वरघंटे, पं.स. सदस्य दुर्गम शेख, संतोष अल्का, बेडके, बानय्या, श्रीधर अनकरी, व्यंकटेश मंचार्ला उपस्थित होते.

Web Title: Extend the scheme to the public