प्रशासनातील सकारात्मक बाबी जनतेपर्यंत पोहोचवा
By Admin | Updated: October 7, 2015 02:23 IST2015-10-07T02:23:34+5:302015-10-07T02:23:34+5:30
गावागावात प्रशासनाची माहिती व कर्तव्याची जागृती करणे आवश्यक आहे. प्रशासनातील सकारात्मक बाबी जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी केले.

प्रशासनातील सकारात्मक बाबी जनतेपर्यंत पोहोचवा
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : पोर्ला येथे महाराजस्व अभियान शिबिर
पोर्ला : गावागावात प्रशासनाची माहिती व कर्तव्याची जागृती करणे आवश्यक आहे. प्रशासनातील सकारात्मक बाबी जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी केले.
तहसील कार्यालय गडचिरोलीच्या वतीने पोर्ला येथे शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर मंगळवारी महाराजस्व अभियान समाधान शिबिर घेण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवणे, तहसीलदार डी. जी. जाधव, संवर्ग विकास अधिकारी पचारे, वनपरिक्षेत्राधिकारी सुनिल कैदलवार, पोर्लाच्या सरपंच कविता फरांडे, उपसरपंच नरेंद्र मामीडवार, तालुका वैद्यकीय अधिकारी मडावी, नगरीचे सरपंच अजय म्हशाखेत्री, वसाच्या सरपंच मंगला भोयर, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा बांगर, उपसरपंच शंकर इंगळे, उपअधीक्षक भूमी अभिलेख कामतवार, तालुका कृषी अधिकारी शेख, प्राचार्य राऊत, सहायक अभियंता पोरेड्डीवार, मुनेशकुमार सिंह, नासरे, वंजारी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार डॉ. देवराव होळी यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक तहसीलदार जाधव, संचालन बीडीओ पचारे यांनी तर आभार येरमे यांनी मानले. यावेळी महसूल, आरोग्य, वन, पशुवैद्यकीय, कृषी, विद्युत, बँक, भूमीअभिलेख विभागामार्फत स्टाल लावून शासकीय योजनांची जनजागृती करण्यात आली. (वार्ताहर)