कुरखेडात कार्यक्रम : क्रिष्णा गजबे यांचे प्रतिपादनकुरखेडा : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ तळागळातील जनतेपर्यंत पोहोचवावा, असे प्रतिपादन आ. क्रिष्णा गजबे यांनी केले. महसूल प्रशासनाच्या वतीने कुरखेडा येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचे उद्घाटन आ. क्रिष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगर पंचायतीचे अध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंशी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पं. स. सदस्य चांगदेव फाये, भाजपाचे तालुकाध्यक्ष राम लांजेवार, शहराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, तहसीलदार तोडसाम, संवर्ग विकास अधिकारी तुरकर, विस्तार अधिकारी फाये, नाजूक पुराम आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिरादरम्यान विविध कार्यालयांनी ७ हजार ७६० क्रमांक ११ चे वितरण केले. प्रास्ताविक नायब तहसीलदार गुंफावार, संचालन तलाठी राठोड तर आभार तहसीलदार तोडसाम यांनी मानले. विविध योजनांचे स्टॉल लावण्यात आले होते. (तालुका प्रतिनिधी)
योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवा
By admin | Updated: June 26, 2016 01:21 IST