मुदतबाह्य खाद्यपदार्थ केले नष्ट

By Admin | Updated: September 2, 2016 01:21 IST2016-09-02T01:21:20+5:302016-09-02T01:21:20+5:30

गडचिरोली येथील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी देसाईगंज येथील सनी कन्फेक्शनी दुकानाच्या

Exposed food consumed | मुदतबाह्य खाद्यपदार्थ केले नष्ट

मुदतबाह्य खाद्यपदार्थ केले नष्ट

देसाईगंज कन्फेक्शनरीच्या गोदामात धाड : अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
देसाईगंज : गडचिरोली येथील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी देसाईगंज येथील सनी कन्फेक्शनी दुकानाच्या गोदामामध्ये धाड टाकून मुदतबाह्य व उत्पादनाची तारीख नसलेल्या ८३ हजार ७०० रूपये किमतीच्या खाद्य पदार्थांचा साठा जप्त करून पंचनाम्यानंतर सदर खाद्यपदार्थाचा साठा जाळून नष्ट केला.

देसाईगंज येथील प्रकाश कन्हैय्यालाल उदासी यांच्या मालकीचे सनी कन्फेक्शनी नावाचे देसाईगंज बाजारपेठेत दुकान आहे. उदासी यांचे गोदाम जे. डांगे राईसमिल परिसरात आहे. या गोदामात मुदतबाह्य खाद्य पदार्थ साठवणूक करून ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती गडचिरोली येथील अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त देशपांडे यांना मिळाली. त्यांनी आपल्या सहकारी, अधिकारी कर्मचाऱ्यांसह देसाईगंज येथील सदर गोदामात बुधवारी धाड टाकली. यावेळी मुदतबाह्य व उत्पादनाची तारीख नसलेले नमकिन, फरसान, फ्रायम व फिगर आदी प्रकारच्या अन्न पदार्थाचा साठा आढळून आला. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी येथून मुदतबाह्य व उत्पादनाची तारीख नसलेल्या ८३ हजार ७०० रूपये किमतीच्या १५ हजार ४२० पॉकेट इतका खाद्यपदार्थाचा साठा जप्त केला. कारवाईनंतर सदर खाद्यपदार्थाचा साठा जाळून नष्ट करण्यात आला.
सदर कारवाई अन्न व औषध प्रशासन नागपूर विभागाचे सहआयुक्त केकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली येथील सहायक आयुक्त (अन्न) देशपांडे, सहायक आयुक्त पवार, अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता) महाजन, नागपूरचे अन्न सुरक्षा अधिकारी वसावे, चंद्रपूरचे अन्न सुरक्षा अधिकारी चौधरी, गडचिरोलीचे अन्न सुरक्षा अधिकारी गिरीष सातकर यांच्या पथकाने केली.
अन्न व औषध प्रशासनाच्या सदर कारवाईमुळे देसाईगंज तालुक्यासह जिल्हाभरात मुदतबाह्य तसेच उत्पादनााची तारीख नसलेल्या पॉकेटबंद खाद्यपदार्थाची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देसाईगंज येथे सदर दुकानात कारवाई केली होती. सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने करवाई करावी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)

Web Title: Exposed food consumed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.