पोलीस शिपायाकडून युवतीचे शोषण
By Admin | Updated: August 26, 2015 01:20 IST2015-08-26T01:20:12+5:302015-08-26T01:20:12+5:30
येथील युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे वारंवार शारीरिक शोषण करणाऱ्या पोलीस शिपायाविरोधात आरमोरी पोलिसांनी पीडित युवतीच्या...

पोलीस शिपायाकडून युवतीचे शोषण
आरमोरी ठाण्यात गुन्हा दाखल : आरोपी पोलीस शिपाई फरार
आरमोरी : येथील युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे वारंवार शारीरिक शोषण करणाऱ्या पोलीस शिपायाविरोधात आरमोरी पोलिसांनी पीडित युवतीच्या तक्रारीवरून मंगळवारी कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील आरोपी पोलीस शिपाई फरार असून आरमोरी पोलीस त्याच्या मागावर आहेत.
विनोद शांताराम बावणे रा. आरमोरी असे आरोपीचे नाव असून तो गडचिरोली पोलीस विभागात विशेष अभियान पथकात पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहे. पीडित युवतीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पोलीस शिपाई विनोद बावणे व माझी अनेकदा गाठभेटही झाली. दरम्यान लग्नाचे आमिष दाखवून विनोदने आपल्याशी अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापीत केले. कालांतराने मी गरोदर राहिले. दरम्यान आपल्याला आताच अपत्य नको, असे म्हणून विनोदने मला २०११ मध्ये गर्भपाताची गोळी दिली. त्यानंतर विनोद २०१२ पर्यंत अहेरीला वास्तव्याने राहू लागला. पुन्हा तीन महिन्यानंतर आरमोरीत आम्हा दोघांची भेट झाली. त्यानंतर विनोदने माझ्याशी भ्रमणध्वनीवरून बोलणे कमी केले. फेब्रुवारी महिन्यात विनोदची गडचिरोली येथे बदली झाली. त्यानंतर अचानक ६ मे २०१५ मध्ये विनोदचे दुसऱ्या एका मुलीशी लग्न झाल्याचे कळले. तेव्हा आपण त्याच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्याचा शोधही घेतला. मात्र ना त्याच्याशी संपर्क झाला व तो भेटलाही नाही. प्रेमभंग झाल्यानंतर माझे मानसिक संतुलन पूर्णत: ढासळले. पोलीस शिपाई विनोद बावणे याचेकडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आपण अ२२ाईवडिलांसोबत थेट चामोर्शी पोलीस स्टेशन गाठले व तेथे रितसर विनोदच्या विरोधात तक्रार दाखल करीत असल्याचे पीडित युवतीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)