सुरजागड लोहखदानीबाबत भूमिका स्पष्ट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:30 IST2021-01-09T04:30:50+5:302021-01-09T04:30:50+5:30
भामरागड (बेज्जूर),वेनहारा, तोडसा, पेरमिली, झाडापापडा, खुटगांव, पावीमुरांडा, कोरची या पारंपरिक इलाख्यातील शेकडो ग्रामसभांनी तसेच भारतीय कॉम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार ...

सुरजागड लोहखदानीबाबत भूमिका स्पष्ट करा
भामरागड (बेज्जूर),वेनहारा, तोडसा, पेरमिली, झाडापापडा, खुटगांव, पावीमुरांडा, कोरची या पारंपरिक इलाख्यातील शेकडो ग्रामसभांनी तसेच भारतीय कॉम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांनी खदान रद्द करण्यास समर्थन जाहीर केले असल्याचे ग्रामसभांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. पण काही रजकीय पदाधिकारी सदर खदान सुरू करण्याची भूमिका मांडत असतात. ते सुरजागड पारंपरिक इलाख्यातील स्थानिक ग्रामसभा आणि जनतेच्या बाजूने आहेत की विरोधात आहेत, हे येत्या १५ दिवसांत जाहीर करावे,असा ठराव ठाकुरदेव यात्रेच्या समारोपापूर्वी झालेल्या पारंपरिक प्रमुखांच्या बैठकीत पारीत करण्यात आला.
राजकीय भूमिका जाहीर केली नाही तर ते स्थानिक ग्रामसभा आणि सुरजागड पारंपरिक इलाखा गोटुल समितीच्या खदान कायमस्वरूपी रद्द करा या मागणीविरोधी आहात असे समजून पक्ष, संघटनांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय ग्रामसभांचे प्रतिनिधी आणि जनतेने घेतला असल्याचे या पत्रकात म्हटले आहे. हे पत्रक सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना पाठविण्यात आले.